पाऊस अपडेट : दिवसभरात कुठे कुठे पावसाची हजेरी?

मुंबई : ऐन दिवाळीतच राज्यातल्या अनेक भागात वादळीवाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अवेळी आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर दुकानात पाणी शिरल्याने सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांना नुकसानही सोसावं लागलं. येत्या दोन दिवसात हलक्या पावसाची शक्यता : हवमान अभ्यासक येत्या दोन दिवसांत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता हवामान अभ्यासक रामचंद्र साबळे यांनी वर्तवली आहे. सोमवारी गोवा, […]

पाऊस अपडेट : दिवसभरात कुठे कुठे पावसाची हजेरी?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:03 PM

मुंबई : ऐन दिवाळीतच राज्यातल्या अनेक भागात वादळीवाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अवेळी आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर दुकानात पाणी शिरल्याने सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांना नुकसानही सोसावं लागलं.

येत्या दोन दिवसात हलक्या पावसाची शक्यता : हवमान अभ्यासक

येत्या दोन दिवसांत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता हवामान अभ्यासक रामचंद्र साबळे यांनी वर्तवली आहे. सोमवारी गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पुन्हा पावसाची शक्यता आहे.

अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले शहरात पावसाने तुफान बॅटिंग केली. त्यामुळे सर्वांचीच धावपळ उडाली. या पावसाने अनेक दुकानांमध्ये पाणी गेल्यानं काहींनी बादल्या बादल्यांनी तर काहींना विजेची मोटर लावून पाणी काढावं लागलं. हा पाऊस नुसताच कोसळला नाही, तर वादळी वारा अन् विजेच्या कडकडाटासह कोसळला. अकोले तालुक्यातल्या मेहेंदुरी गावात एका नारळाच्या झाडावर वीज कोसळली आणि त्या झाडानं पेट घेतला. सुदैवाने या झाडाच्या आसपास कुणी नसल्याने जीवितहानी झाली नाही.

नाशिक

नाशिक शहरासह जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये वादळवारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मनमाड, मालेगाव, नांदगाव परिसरात चांगला पाऊस झाला. मालेगावात पाऊस सुरु होताच वीज पुरवठा खंडित झाला. तर नांदगाव तालुक्यातील पिंपराळे येथे अंगावर वीज पडून महादेव सदगीर या इसमाचा  मृत्यू झाला. चांदवड तालुका अन् शहरात मुसळधार पाऊस झाला. लासलगाव परिसरात देखील पावसानं जोरदार हजेरी लावली. त्याचा फायदा उशिराची खरीप पिके तसेच रांगडा कांद्याच्या पिकाला होण्याची शक्यता असल्याने शेतकरी आनंदात आहेत.

पुणे

पुणे शहरातल्या बाजार पेठा आणि उपनगरात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस पडला. सिंहगड रोड, बिबवेवाडी, सहकारनगर, कोंढवा, सातारा रास्ता परिसर, शिवाजीनगर, टिळक रास्ता आणि स्वारगेट परिसरात तासभर पाऊस पडला. या पावसानं शहरात सखल भागात पाणी साचलं. मार्केट यार्ड परिसरात पाणी साचल्यानं काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

रायगड

रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूरमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. महाड परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. भात कापणीच्या हगांमामध्ये पाऊस आल्याने शेतकरी चिंतीत झालाय. पावसामुळे शेतकरी चिंतेत आहे.

सातारा

सातारा शहर आणि परिसरात सायंकाळी आभाळ भरुन आलं आणि बघता-बघता पावसाचे टपोरे थेंब पडू लागले. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात पावसाने सातारकरांना चांगलेच झोडपले. महाबळेश्वरमध्ये देखील मुसळधार पाऊसाने जनजीवन विस्कळीत झाले. अचानक आलेल्या पावसामुळे पर्यटकांसह स्थानिक व्यापाऱ्यांची धांदल उडाली होती.

विदर्भ

विदर्भातल्या वाशिम आणि बुलडाण्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली. वाशिम शहरासह ग्रामीण भागात मध्यरात्री रिमझिम पाऊस झाल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खरीपमधील तूर तसेच रब्बीत पेरलेल्या पिकांना फायदा होणारा हा पाऊस असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर बुलडाणा शहरात अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं शहरवासीय सुखावले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.