पाच राज्यांच्या निवडणुकांवर अखेर राज ठाकरेंचं व्यंगचित्र आलं!

मुंबई : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. पाचही राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक मंत्री-नेते प्रचारात उतरुनही, भाजप पूर्णपणे पिछाडीवर गेले आहे. हाच धागा पकडत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी-शाह जोडगोळीवर आपल्या कुंचल्यातून फटकारे ओढले आहेत. व्यंगचित्रात काय आहे? राज ठाकरेंनी व्यंगचित्रात अहंकाराची खुर्ची दाखवली …

, पाच राज्यांच्या निवडणुकांवर अखेर राज ठाकरेंचं व्यंगचित्र आलं!

मुंबई : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. पाचही राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक मंत्री-नेते प्रचारात उतरुनही, भाजप पूर्णपणे पिछाडीवर गेले आहे. हाच धागा पकडत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी-शाह जोडगोळीवर आपल्या कुंचल्यातून फटकारे ओढले आहेत.

व्यंगचित्रात काय आहे?

राज ठाकरेंनी व्यंगचित्रात अहंकाराची खुर्ची दाखवली आहे. त्या खुर्चीखालील जमिनीला तडे गेल्याने खुर्ची डळमळताना दिसते असून, अमित शाह खुर्ची सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत. राज ठाकरेंनी एका बाजूला लिहिले आहे की, “तडा! कधीही भरुन न निघणारा!”

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने सत्ता स्थापनेपर्यंत मुसंडी मारली आहे. तर तेलंगणा आणि मिझोराममध्ये प्रादेशिक पक्षांनी सत्ता काबीज केली आहे. कुठेही भाजप आणि नरेंद्र मोदी यांन आपला करिष्मा दाखवता आला नाही.

, पाच राज्यांच्या निवडणुकांवर अखेर राज ठाकरेंचं व्यंगचित्र आलं!

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *