Raj Thackeray | लोकांना आमच्याकडून अपेक्षा, मात्र मतदान आम्हाला नाही : राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray speech MNS anniversary) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 14 व्या वर्धापन दिनी मनसैनिकांना मार्गदर्शन केलं.

Raj Thackeray | लोकांना आमच्याकडून अपेक्षा, मात्र मतदान आम्हाला नाही : राज ठाकरे
Follow us
| Updated on: Mar 09, 2020 | 1:47 PM

मंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray speech MNS anniversary) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 14 व्या वर्धापन दिनी मनसैनिकांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी मनसेची वाटचाल आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. या वर्धापन दिन सोहळ्यात मनसेने शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. प्रत्येक खात्यावर मनसेचा एक नेता त्याच्या टीमसह लक्ष ठेवणार आहे. यावेळी राज ठाकरे म्हणाले, “शॅडो कॅबिनेट अर्थात प्रति मंत्रिमंडळात एवढी नावं टाकण्याले कोणालाही वाटू नये मी मंत्री झालो. सर्वांना सांगितलं आहे हट्ट धरू न का की पैश्याचं खातं मिळालं नाही. चुकीची गोष्ट झाली तर वाभाडे काढा, पण सरकार चांगलं वागलं तर चांगलं म्हणा” (Raj Thackeray speech MNS anniversary)

14 वर्ष कशी गेली हे सर्वांना माहीत आहे. 13 आमदार निवडून आले होते मग पुढे काय झालं हे प्रश्न आम्हलाच फक्त का विचारता? ज्यांनी जास्त वर्ष राज्य केले त्या काँग्रेसची दिल्लीत कशी अवस्था झाली हे कळलं.

दिल्लीत 70 पैकी काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही, 63 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं, त्याची चर्चा नाही, आम्हालाच प्रश्न 13 आमदार निवडून आले होते काय झालं? लाटा येतात जातात, असं राज ठाकरे म्हणाले.

देशात 60-70 वर्ष राज्य करणाऱ्या काँग्रेसची बिकट परिस्थिती, दिल्ली निवडणुकीत एकही आमदार निवडून आलेला नाही, मग तुमचे 13 आमदार निवडून आले होते? हा प्रश्न आम्हालाच का विचारता, भाजपलाही अनेक राज्यात हादरे बसले, असं राज ठाकरेंनी नमूद केलं.

देशात अशा लाटा येत असतात.  यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला अनेक सल्लागार असतात. सर्व चढउतार होत असताना तुम्ही सर्वजण मनसेच्या मागे उभे राहिलात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. अनेकांना प्रश्न पडतात की राज ठाकरे सोबत एवढी माणसं कुठून येतात? असं राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी आणि समाजगटांसाठी काम करणारं हे खातं आहे. सरकारचं वाभाडे जिथे काढायचे आहेत तिथे वाभाडे काढा आणि जिथे सरकार चांगलं काम करेल तिथं त्यांचं अभिनंदन पण करू, असं राज ठाकरे शॅडो कॅबिनेटबाबत म्हणाले.

गेल्या 14 वर्षात आपण अनेक कामं केली, तरीही मतदानाच्या वेळेस लोकं कुठे जातात हे कळत नाही, लोकांना कामाच्या अपेक्षा आमच्याकडून आहेत, पण मतदान आम्हाला नाही करणार ह्याला काय अर्थ आहे? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

प्रतिरूप मंत्रिमंडळाच्या बाबतीत पक्षाचे पदाधिकारी नसलात पण तुम्हाला एखाद्या विषयात काम करायची इच्छा असेल तर त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा. मी तुम्हाला ह्या कामात सहभागी करून घेईन,  असं यावेळी राज ठाकरेंनी सांगितलं.

चढ उतार पाहत असताना तुम्ही माझ्याबरोबर राहिलात त्याबाबत धन्यवाद. अनेकांना याचंच आश्चर्य वाटतं. निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानतंर एवढी माणसं येतात कुठून लोकांना रिझर्ल्टपण दिले. सत्तेवर बसलेल्यांकडून अपेक्षा नाहीत आणि माझ्याकडून अपेक्षा. पण मी अशा अपेक्षांचं करु काय? जे विषय आहेत ते 25 मार्चला शिवतीर्थावर मांडेन. जनतेला सांगू इच्छितो की सरकारवर अंकुश असावा म्हणून हे शॅडो कॅबिनेट आहे. मला सांगितल्याशिवाय पुढे जायचं नाही. पत्रकार परिषद मला सांगितल्याशिवय घ्यायची नाही. ब्लॅकमेल करणारे आरटीआय टाकायचे नाही, असा सल्ला यावेळी राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिला.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.