आरोग्यमंत्री राजेश टोपे थेट धारावी झोपडपट्टीत, कोरोना नियंत्रण कामाची बारकाईने पाहणी

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी थेट धारवी झोपडपट्टीला भेट दिली आहे (Rajesh Tope Visit Dharavi Slum amid Corona).

आरोग्यमंत्री राजेश टोपे थेट धारावी झोपडपट्टीत, कोरोना नियंत्रण कामाची बारकाईने पाहणी

मुंबई : जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या मुंबईतील धारावी झोपडपट्टी भागात कोरोनाचे 7 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेल्या या ठिकाणी कोरोना संसर्गाचा धोका प्रचंड वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी थेट धारवीला भेट दिली आहे (Rajesh Tope Visit Dharavi Slum amid Corona). त्यांनी याभागात सुरु असलेल्या सर्वेक्षण कामाचा आणि क्वारंटाईन सुविधांचा आढावा घेतला. यावेळी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड देखील त्यांच्यासोबत उपस्थित होत्या.

राजेश टोपे यांनी धारावी भागातील कोरोना उपचारासाठीच्या हॉस्पीटलला भेट देऊन व्हेंटिलेटर्सची संख्या वाढवण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या. क्वारंटाईनच्या सुविधेचीही त्यांनी पाहणी केली. टोपे यांनी धारावीमध्ये विलगीकरणाची (क्वारंटाईन) सुविधा असलेल्या राजीव गांधी स्पोर्टस् कॉम्प्लेक्सलाही भेट दिली. संसर्ग रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी अधिक कडक अमंलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी या विभागाच्या पोलिस अधिकाऱ्यांना दिले.

धारावी भागात 50 खाटांचे साई हॉस्पिटल केवळ कोरोना उपचारासाठी घोषित केले आहे. तेथे व्हेंटिलेटर्सची संख्या वाढवण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले. राजीव गांधी स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये 350 खाटांची विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या भागात 3500 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. अनेक संस्था, दानशूर व्यक्तींकडून याभागात धान्य, गरजेच्या वस्तूंचे वाटप केले जात आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धारावी पोलिस ठाण्यातच आपली बैठक घेतली. संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी त्यांनी गर्दी होणार नाही याची दक्षता घेतानाच नियमांच्या कडक अमंलबजावणीचे निर्देश दिले. या भागात असलेल्या सार्वजनिक स्वचछतागृहांमध्ये सातत्याने निर्जंतुकरणाची प्रक्रिया राबवावी अशा सूचनाही त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या.

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई30542374988
पुणे (शहर+ग्रामीण)5117938250
पिंपरी चिंचवड मनपा230347
ठाणे (शहर+ग्रामीण)
30103640
नवी मुंबई मनपा20078029
कल्याण डोंबिवली मनपा889917
उल्हासनगर मनपा1693
भिवंडी निजामपूर मनपा86113
मिरा भाईंदर मनपा4641575
पालघर 11413
वसई विरार मनपा56210515
रायगड41255
पनवेल मनपा33012
नाशिक (शहर +ग्रामीण)22522
मालेगाव मनपा71144
अहमदनगर (शहर+ग्रामीण)73365
धुळे1189
जळगाव 411141
नंदूरबार 322
सोलापूर6014141
सातारा27935
कोल्हापूर 25921
सांगली80291
सिंधुदुर्ग1020
रत्नागिरी15523
औरंगाबाद12561446
जालना560
हिंगोली 11210
परभणी221
लातूर 6782
उस्मानाबाद 3130
बीड260
नांदेड 98‬4
अकोला 4021417
अमरावती 16814
यवतमाळ 115220
बुलडाणा 4083
वाशिम 80
नागपूर471847
वर्धा 401
भंडारा1000
गोंदिया 3910
चंद्रपूर1910
गडचिरोली1300
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)49011
एकूण50231146001635

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाचा गुणाकार, रुग्णांची संख्या हजार पार!

Pune Curfew | पुणे पोलिसांचं आणखी एक कडक पाऊल, शहरात 5 ठिकाणी कर्फ्यू लागू

बारामतीत कोरोनाचा विळखा वाढला, कोरोनाबाधित भाजी विक्रेत्याच्या मुलाला आणि सुनेला कोरोनाची लागण

Rajesh Tope Visit Dharavi Slum amid Corona

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *