बांधावर जाऊनच शेतकऱ्यांचा आक्रोश कळेल, राजू शेट्टींची ठाकरे सरकारवर टीका

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार या कृषी विभागाच्या उपक्रमावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी टीका केली (Raju Shetti criticizes government) आहे.

बांधावर जाऊनच शेतकऱ्यांचा आक्रोश कळेल, राजू शेट्टींची ठाकरे सरकारवर टीका
Follow us
| Updated on: Feb 08, 2020 | 6:31 PM

बुलडाणा : शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार या कृषी विभागाच्या उपक्रमावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी टीका केली (Raju Shetti criticizes government) आहे. “शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना कळेल की किती आक्रोश आहे,” असे राजू शेट्टी म्हणाले. जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडूंवर आरोप करणाऱ्या मंत्र्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करावी असेही राजू शेट्टी म्हणाले.

माजी खासदार राजू शेट्टी हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी राजू शेट्टींनी बुलडाणा जिल्हा कार्यकारिणी बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली.

“ठाकरे सरकारने कृषी मंत्री आणि खात्याच्या अधिकाऱ्यांना थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधण्याचा उपक्रम सुरू केला आहे. तो योग्य असेल पण त्यांना बांधावर जाऊन कळेल की शेतकऱ्यांचा किती आक्रोश आहे. त्यानंतरच त्यांचे डोळे उघडतील. कारण सरकारने जी कर्जमाफी जाहीर केली आहे. त्याचा मोजक्या 10 ते 15 टक्के शेतकऱ्यांना फायदा होईल,” असेही राजू शेट्टी (Raju Shetti criticizes government) म्हणाले.

“शेतमालाला भाव योग्यरित्या मिळाला पाहिजे. तेव्हाच शेतकरी आर्थिक अडचणीतून सुटतील,” असेही राजू शेट्टींनी यावेळी सांगितलं.

दोन लाखांची कर्जमाफी ही बुजगावणी आहे असा आरोप बच्चू कडू यांनी केला होता. त्या आरोपांचे समर्थन करत हा आरोप योग्य असल्याचेही राजू शेट्टी म्हणाले.

तर शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी बच्चू कडूंवर टीका केली होती. त्यावर सत्य बोचत असेल तर त्यांनी शेतकऱ्यांच्या दारात जावे. तसेच असे वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करावी अशी मागणी राजू शेट्टींनी (Raju Shetti criticizes government) केली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.