राजू शेट्टी सूर्य, तुम्ही काजवे, सेना आमदाराला खरमरीत पत्र

मुंबई : सोलापुरात सध्या खासदार राजू शेट्टी आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्यातील वाद चर्चेचा विषय आहे. या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार टीका होत असताना, खासदार राजू शेट्टी यांच्या लहानग्या कार्यकर्त्याने आमदार तानाजी सावंत यांना खुलं पत्र लिहून खरमरीत टीका केली आहे. रणजित बागल असे या राजू शेट्टींच्या कार्यकर्त्याचे नाव असून, रणजितचे हे पत्र सध्या …

राजू शेट्टी सूर्य, तुम्ही काजवे, सेना आमदाराला खरमरीत पत्र

मुंबई : सोलापुरात सध्या खासदार राजू शेट्टी आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्यातील वाद चर्चेचा विषय आहे. या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार टीका होत असताना, खासदार राजू शेट्टी यांच्या लहानग्या कार्यकर्त्याने आमदार तानाजी सावंत यांना खुलं पत्र लिहून खरमरीत टीका केली आहे. रणजित बागल असे या राजू शेट्टींच्या कार्यकर्त्याचे नाव असून, रणजितचे हे पत्र सध्या सोशल मीडियार तुफान व्हायरल होत आहे.

राजू शेट्टी आणि तानाजी सावंत वाद काय?

थकीत एफआरपीवरुन खासदार राजू शेट्टी आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली होती. साखर आयुक्तांच्या कार्यालयात बसून राजू शेट्टींनी आमदार सावंतांच्या कारखान्याचा गाळप परवाना रद्द केला होता. यामध्ये आता शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

काल शिवसेनेने पंढरपूरमध्ये छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन करुन शेट्टींच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. शिवसेना नेते आमदार तानाजी सावंत यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी खासदार राजू शेट्टींच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने पंढरपुरात आंदोलन करण्यात आले. राजू शेट्टींच्या प्रतिकात्मक फोटोला गाढवावर बसवून जोडे मारण्यात आले.

त्यानंतर आज खासदार राजू शेट्टी यांचा कार्यकर्ता असलेल्या रणजित बागल याने फेसबुकवरुन तानाजी सावंत यांना उद्देशून खरमरीत पत्र लिहंल आहे. या पत्राची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

रणजित बागल यांचे पत्र :

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *