देश रात्री झोपताना दिवे चालू ठेवूनच झोपतो का? राम कदमांचा ऊर्जामंत्र्यांना सवाल

देश रात्री झोपताना दिवे चालू ठेवून झोपतो का? असा प्रश्न भाजप नेते राम कदम (Ram Kadam slams Nitin Raut) यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना विचारला आहे.

देश रात्री झोपताना दिवे चालू ठेवूनच झोपतो का? राम कदमांचा ऊर्जामंत्र्यांना सवाल
Follow us
| Updated on: Apr 04, 2020 | 7:53 AM

मुंबई : देश रात्री झोपताना दिवे चालू ठेवून झोपतो का? असा प्रश्न भाजप नेते राम कदम (Ram Kadam slams Nitin Raut) यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता आपआपल्या घरातील लाईट बंद करुन 9 मिनिटे दिवे किंवा टॉर्च लावून कोरोनाविरोधात लढा देण्यास सांगितले आहे. मात्र, यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आक्षेप घेतला आहे (Ram Kadam slams Nitin Raut).

“9 मिनिटे एकाचवेळी लाईट बंद केल्यास तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण राज्य आणि देश अंधारात जाण्याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे जनतेनेआवश्यक तितकेच लाईट चालू ठेऊन, दिवे, मेणबत्ती लावावेत”, असे आवाहन ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी जनतेला केले आहे. मात्र, त्याच्या याच आवाहनावर राम कदम यांनी टीका केली.

“नितीन राऊत यांनी सेंट्रल पॉवर ग्रीडच्या अधिकाऱ्यांशी आणि अन्य तज्ज्ञांशी चर्चा न करता केवळ अभ्यासपूर्ण व्हाट्स अॅपच्या आधारावर बेजबाबदार वक्तव्य केलं आहे. देश रात्री झोपताना दिवे चालू ठेवूनच झोपतो की बंद करुन झोपतो? यावरच तुमच्या सरकारचा भंपकपणा दुर्देवाने दिसून येतो”, असा टोला राम कदम यांनी लगावला.

ऊर्जामंत्री नितीन राऊत नेमकं काय म्हणाले?

जर देशात एकाचवेळी लाईट बंद केल्यास विजेची मागणी कमी होऊ शकते. लॉकडाऊनमुळे आधीच विजेची मागणी घटल्यामुळे वीज उत्पादन आणि पुरवठ्याचे गणित बदलले आहे. जर सर्वांनी एकाचवेळी लाईट बंद केल्यास अजून परिस्थिती बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

रीडमध्ये अचानक विजेची मागणी वाढल्यास किंवा कमी झाल्यास फ्रिक्वेन्सीमध्ये अनावश्यक बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून जनतेने काळजीपूर्वक विचार करावा आणि आवश्यक तितके लाईट चालू ठेऊन, दिवे किंवा मेणबत्ती लावावी, असे आवाहन डॉ. राऊत यांनी जनतेला केले आहे.

सध्यस्थितीत महाराष्ट्र राज्याची पॉवर डिमांड ही 23 हजार मेगावॅटवरुन 13 हजार मेगावॅटवर आली आहे. लॉकडाऊनमुळे इंडस्ट्री लोड पूर्णतः झिरो झाले आहे. 13 हजार मेगावॅट विजेवर केवळ अत्यावश्यक सेवा आणि घरगुती विजेचा लोड आहे. सर्वांनी अचानक दिवे बंद केल्यास सर्व पावरस्टेशन (Nitin Raut Reaction On Modi) हायफ्रिक्वेन्सीवर जाऊ शकतात. परिणामी आपल्या ग्रीडमध्ये अनावश्यक फीडर ट्रीपिंग्स येऊ शकतात.

मोठ्या प्रमाणात पावर डिमांड असलेल्या महाराष्ट्रासारख्या इतर राज्यात वीज फेल्युरमुळे परिणामी सर्व पावर स्टेशन बंद पडल्यास “मल्टी स्टेट ग्रीड फेल्युर” होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अत्यावश्यक सेवा, हॉस्पिटल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, एक पावर स्टेशन सर्व्हिसमध्ये यायला साधारणतः 12-16 तास लागू शकतात.

कोरोना विरुद्ध युद्धासाठी या देशातील वीज ही सर्वांत महत्त्वाची घटक आहे. त्यामुळे विजेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करण्याचे आवाहन राऊत यांनी जनतेला केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

कोरोनाग्रस्त बांधवांना आपल्याला प्रकाशाच्या वाटेवर न्यायचं आहे. त्यासाठी या रविवारी प्रकाशाची ताकद दाखवायची आहे. रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता मला तुमचे 9 मिनिट द्या, घरातील सर्व दिवे बंद करा आणि बाल्कनीत उभे राहून 9 मिनिट मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावा, असं आवाहन मोदींनी जनतेला केलं आहे

Non Stop LIVE Update
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.