गंगाधरही भेटीला येण्याचे संकेत, रामायण पाठोपाठ शक्तिमानही सुरु करण्याची मागणी

प्रेक्षकांच्या आग्रहास्तव ‘रामायण’ पुन्हा (Ramayan Re-telecast During Lock Down) एकदा टीव्हीवर दाखवली जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी दिली.

गंगाधरही भेटीला येण्याचे संकेत, रामायण पाठोपाठ शक्तिमानही सुरु करण्याची मागणी

मुंबई : प्रेक्षकांच्या आग्रहास्तव ‘रामायण’ पुन्हा (Ramayan Re-telecast During Lock Down) एकदा टीव्हीवर दाखवली जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी दिली. आता 21 दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान ‘शक्तिमान’सुद्धा पुन्हा सुरु करावी अशी जोरदार मागणी सोशल मीडियावर होऊ लागली आहे. सध्या ट्विटरवर #Shaktiman ट्रेण्ड करत आहे. मुकेश खन्नाची प्रमुख (Ramayan Re-telecast During Lock Down) भूमिका असलेली ही मालिका 90 च्या दशकात प्रचंड लोकप्रिय होती.

प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. “जनतेच्या मागणीवर शनिवारपासून (28 मार्च) रामायण दिवसाला दोनवेळा डीडी नॅशनलवर प्रसारीत होणार आहे. डीडी नॅशनलवर एक एपिसोड सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत तर दुसरा एपिसोड रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत प्रसारीत केला जाईल. “, असं ट्विट प्रकाश जावडेकर यांनी केलं.

प्रसार भारतीचे सीईओ शशी शेखर यांनी गुरुवारी ट्विट करत माहिती दिली की, लवकरच दूरदर्शनवर ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ पुन्हा दाखवलं जाईल.

रामानंद सागरची रामायण (Ramayan) 25 जानेवारी, 1987 ते 31 जुलाई 1988 पर्यंत चालली. रामयणमध्ये राम यांची भूमिका अरुण गोविल यांनी साकारली होती. तर सीता माताची भूमिका दीपिका चिखलिया, अरविंद त्रिवेदी यांनी रावण आणि दारा सिंग यांनी हनुमानची भूमिका साकारली होती.

सध्या देशावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे येत्या 14 एप्रिलपर्यंत कुणालाही त्यांच्या घरातून बाहेर पडायची परवानगी नाही. तसेच, लॉकडाऊनमुळे इतर सर्व मालिकांचे, सिनेमांचे शूटही बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना घरी बोअर होऊ नये यासाठी ‘रामायण’ ही मालिका पुन्हा दाखवली (Ramayan Re-telecast During Lock Down) जाणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *