राणेंच्या मागणीला आठवलेंचा पाठिंबा, राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी

रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रमुख रामदास आठवले यांनी देखील महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा सूर काढला आहे (Ramdas Athawale on Presidential Rule).

राणेंच्या मागणीला आठवलेंचा पाठिंबा, राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी
Follow us
| Updated on: May 27, 2020 | 5:28 PM

नवी दिल्ली : रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रमुख रामदास आठवले यांनी देखील महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा सूर काढला आहे (Ramdas Athawale on Presidential Rule). त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोरोना नियंत्रण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे.

रामदास आठवले म्हणाले, “महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 54 हजारहून अधिक झाली आहे. महाराष्ट्र अगदी कोरोनामय झाला आहे. मुंबई देखील कोरोनामय झाली आहे. या कोरोनाचा सामना करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारची होती. मात्र, महाविकास आघाडीचं सरकार कोरोनाचा सामना करण्यात अपयशी ठरलं आहे. त्यामुळे सर्वाधिक 1 हजार कोरोना मृत्यू मुंबईत झाले आहेत. अशास्थितीत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आली, तरी भाजपचं सरकार येईल असं मला वाटत नाही. कारण भाजपला सत्ता स्थापनेसाठी आघाडीतील तीनपैकी एका पक्षाचा पाठिंबा लागणार आहे. तरच महायुतीचं सरकार येईल. त्यामुळे राष्ट्रपती राजवटीमुळे महायुतीचं सरकार येईल असं नाही.”

सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता कोरोना नियंत्रणात महाविकास आघाडी अपयशी ठरलं आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

एकनाथ खडसे यांना सत्तेत सहभाग मिळेल असा विश्वास : रामदास आठवले

रामदास आठवले म्हणाले, “मी नाराज होतो, मात्र आता नाराज होण्याची अजिबात आवश्यकता नाही. मला राज्यसभेचं सदस्यत्व मिळालं आहे. केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळालं आहे. आम्हाला एक विधान परिषदेची जागा मिळावी अशी अपेक्षा होती. पण, तसं झालं नाही. भारतीय जनता पक्षाचा निर्णय मान्य करणं अत्यंत आवश्यक आहे. वरिष्ठ नेत्यांना सत्ता मिळाली होती. त्यामुळे भाजपमध्ये पक्षासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या नवीन लोकांना संधी मिळणं आवश्यक होतं. तसाच निर्णय पक्षाने घेतला आहे. एकनाथ खडसे यांच्या सारख्या नेत्यांना ते वरिष्ठ असल्याने दिल्लीत कोठेही सामावून घेता येईल. त्यांनाही सत्तेत सहभाग मिळेल असा मला विश्वास आहे.”

संबंधित बातम्या :

LIVE : देशात सर्वात चांगले काम मुंबईत : जयंत पाटील

मुंबई पुण्यातील चाकरमान्यांनी अहमदनगरची चिंता वाढवली, जिल्ह्यात 94 कोरोनाबाधित

लाचार काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं, राधाकृष्ण विखे पाटलांचा हल्लाबोल

संबंधित व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.