रत्नागिरीत कोरोनाबाधित महिलेचा धिंगाणा, आरोग्य कर्मचाऱ्यांना ट्यूबलाईट मारण्याचा प्रयत्न

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्ण आणि संशयित नातेवाईकांनी थेट जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धमकी देत अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडला आहे.

रत्नागिरीत कोरोनाबाधित महिलेचा धिंगाणा, आरोग्य कर्मचाऱ्यांना ट्यूबलाईट मारण्याचा प्रयत्न

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांनी (Ratnagiri Corona Patient ) गुरुवारी रात्री धिंगाणा घातला. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलेला विलगीकरण कक्षात जाण्यास सांगितले. तसेच, रिपोर्ट खोटे बनवले असल्याचा कांगावा करत या रुग्णांनी हंगामा केला. इतकंच नाही, तर जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन केलेले रुग्ण कर्मचाऱ्यांच्या अंगावरही धावून गेले. कोरोनाबाधित महिलेने आरोग्य (Ratnagiri Corona Patient ) कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचंही उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा आता 5 वर पोहोचला आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्ण आणि संशयित नातेवाईकांनी थेट जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धमकी देत अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडला आहे. असा आरोप जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यानंतर नर्स, डॉक्टर आणि वॉर्डबॉय यांनी आक्रमक भूमिका घेत या साऱ्या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे धमकीचा सारा प्रकार जिल्हा शल्यचिकित्सक बोल्डे यांच्या कानावर घातल्यानंतर देखील त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी ऑनड्युटी असणारे कर्मचारी अरुण डांगे यांनी केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

कोरोनाबाधित महिला रुग्णाच्या नातेवाईकांना जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले आहे. यांचे रिपोर्ट हे गुरुवारी रात्री आले. यातील एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या कोरोनाबाधित महिला रुग्णाला वेगळ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करावे लागेल, अशी माहिती संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली. यावेळी या संशियत रुग्णांनी आणि कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या महिला रुग्णाने (Ratnagiri Corona Patient ) एकच हंगामा केला.

‘तुम्ही हे रिपोर्ट खोटे बनवून आणले’, असा आरोप करत ते कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून गेले. ‘आम्ही तुम्हाला बघून घेऊ. उद्या सकाळी तुम्ही सगळे कुठे असाल हे तुम्हाला कळणार नाही’ अशी धमकी कोरोनाबाधितच्या नातेवाईकांनी दिली. असा आरोप जिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आहे. तसेच एका नातेवाईकाने भिंतीवरील ट्युबलाईट काढून अंगावर धावून आला, अशी माहितीही कर्मचाऱ्याने दिली आहे.

हे सर्व प्रकरण आम्ही जिल्हा शल्य चिकित्सकांना फोनवरुन सांगितलं, त्यांनीही फोन वरुन सूचना केल्या. मात्र, कोणी अधिकारी इथे आला नाही. अशी तक्रार या कर्मचाऱ्यांची आहे. त्यामुळे आमच्या सुरक्षेचे काय? असा सवाल आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली (Ratnagiri Corona Patient) आहे.

संबंधित बातम्या :

बीएमसीच्या मदतीसाठी अक्षय कुमार धावला, मास्क आणि टेस्टिंग किट्ससाठी 3 कोटींची मदत

Corona : पुण्यात एका दिवसात 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू, 12 नवे रुग्ण

Corona – जगभराची खबरबात | मृतांचा आकडा एक लाखाच्या उंबरठ्यावर

Lockdown : लॉकडाऊनमध्ये मुलगा अडकला, आईने तब्बल 1400 किमी स्कूटर चालवून परत आणलं

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *