वर्ल्डकप टीममध्ये कोण कोण असेल? रवी शास्त्री म्हणतात...

मुंबई : क्रिकेट वर्ल्डकप अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे वर्ल्डकपच्या संघात कोण कोण असेल याची उत्सुकता तमाम क्रिकेट रसिकांना लागली आहे. अशातच भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वर्ल्डकप टीमबाबत सूचक वक्तव्य केले आहे. काय म्हणाले रवी शास्त्री? भारतीय संघ 2019 च्या विश्वचषकाआधी केवळ 13 वनडे सामने खेळाणार आहे. त्यामुळे येत्या काळात खेळल्या …

वर्ल्डकप टीममध्ये कोण कोण असेल? रवी शास्त्री म्हणतात...

मुंबई : क्रिकेट वर्ल्डकप अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे वर्ल्डकपच्या संघात कोण कोण असेल याची उत्सुकता तमाम क्रिकेट रसिकांना लागली आहे. अशातच भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वर्ल्डकप टीमबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले रवी शास्त्री?

भारतीय संघ 2019 च्या विश्वचषकाआधी केवळ 13 वनडे सामने खेळाणार आहे. त्यामुळे येत्या काळात खेळल्या जाणाऱ्या वनडेमध्ये भारतीय संघात फारसे बदल दिसणार नसल्याचे सूचक वक्तव्य भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केलं आहे. तसेच, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळणारे 15 खेळाडूंपैकी जवळपास सर्वच खेळाडू वनडे विश्वचषकात खेळतील, अशी माहिती रवी शास्त्रीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

रवी शास्त्री पुढे म्हणाले की, “भारतीय संघाने एकाग्र होऊन खेळण्याची ही योग्य वेळ आहे. आता आम्हाला आगामी 13 वनडे सामन्यांमध्ये प्रयोग करण्यास वाव आहे.” तसेच, मी माझ्या 15 अव्वल खेळाडूंसोबत विश्वचषक खेळणार आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, भारतीय संघ येत्या काळात 13 वनडे सामन्यांपैकी 3 सामने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळणार आहे. त्यानंतर पाच वनडे सामन्यांची मालिका न्यूझीलंडविरुद्घ खेळणार आहे. तर पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियन टीम भारतीय दौऱ्यावर असून त्यावेळी 5 वनडे सामने खेळले जातील.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचे वनडे सामने

पहिला सामना – 12 जानेवारी

दुसरा सामना – 15 जानेवारी

तिसरा सामना – 18 जानेवारी

दरम्यान, पुढच्या वर्षी इंग्लंडमध्ये विश्वचषक होणार आहे. या विश्वचषकात भारतीय संघ 5 जूनला पहिला वनडे सामना दक्षिण अफ्रिकेविरुद्घ खेळणार आहे. त्यादृष्टीने भारतीय संघाची तयार सुरु असल्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या बोलण्यावरुन स्पष्टपणे जाणवते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *