रेल्वेचा मोठा निर्णय, स्टेशन काऊंटरवरही रिझर्व्हेशन तिकीट बुकिंग

22 मे पासून म्हणजेच उद्यापासून प्रवाशी रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर जाऊन तिकीट बुकिंग करु शकणार आहेत.

रेल्वेचा मोठा निर्णय, स्टेशन काऊंटरवरही रिझर्व्हेशन तिकीट बुकिंग
Follow us
| Updated on: May 21, 2020 | 11:28 PM

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने जनतेला आणखी एक (Re-opening Of Reservation Counters) दिलासा दिला आहे. रेल्वे स्थानकावरील आरक्षण तिकीट खिडकी प्रवाशांसाठी अखेर खुली करण्यात येत आहे. 22 मे पासून म्हणजेच उद्यापासून प्रवाशी रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर जाऊन तिकीट बुकिंग करु शकणार आहेत. त्याशिवाय, 1 जूननंतर चालवण्यात येणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांची तिकिटं रद्द झाल्यास प्रवाशांना पूर्ण रिफंड (Re-opening Of Reservation Counters) मिळणार आहे.

आरक्षित प्रवासासाठी प्रवाशांना रेल्वे स्थानक, रेल्वे परिसरातील काउंटरवरुन तिकीट बुक करता येणार आहे. तिकिटांच्या बुकिंग दरम्यान सोशल डिस्टन्सिंगची जबाबदारी तिथल्या विभागीय रेल्वेवर असेल, असं रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे. रेल्वे मंत्री रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली.

1 जूनपासून देशभरात 200 नॉन एसी रेल्वेगाड्या धावणार

येत्या 1 जूनपासून देशभरात 200 नॉन एसी रेल्वेगाड्या नियोजित वेळेनुसार धावणार आहेत. त्यासाठी 21 मे रोजी 10 वाजल्यापासून तिकिटांचे ऑनलाइन बुकिंग सुरु करण्यात आले. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटवरवरुन यासंदर्भात घोषणा करुन शंभर ट्रेनचे वेळापत्रक जाहीर केले (Re-opening Of Reservation Counters).

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कोणार्क एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, उद्यान एक्स्प्रेस, हुसेन सागर एक्स्प्रेस 1 जूनपासून सुटणार आहेत. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसहून दरभंगा एक्स्प्रेस, कामयानी एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, तर वांद्रे टर्मिनसहून सूर्यनगरी एक्स्प्रेस, अवध एक्स्प्रेस या ट्रेन सुटणार आहेत. यासाठी ऑनलाईन बुकिंग सुरु झाली आहे.

पीआयबीच्या वेबसाईटवर 100 ट्रेनची यादी जाहीर करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सर्व मेल/एक्स्प्रेस, प्रवासी आणि उपनगरी सेवांसह इतर नियमित प्रवासी ट्रेन मात्र पुढील आदेशापर्यंत रद्द राहतील.

Re-opening Of Reservation Counters

संबंधित बातम्या :

नॉन एसी ट्रेनसाठी ऑनलाइन बुकिंगची वेळ जाहीर, ‘या’ शंभर ट्रेन एक जूनपासून धावणार

देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक पुन्हा सुरु होणार, तिकीट दर निश्चित, नियमावली जाहीर

Maharashtra Corona | राज्यात कोरोनाचे 2,345 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 41 हजार 642 वर

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.