काही गोष्टी दिसू नयेत म्हणून नेते भिंत बांधतात, रोहित पवारांचा भाजपला टोला

रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत भाजपवर टीका केली (NCP MLA Rohit Pawar).

काही गोष्टी दिसू नयेत म्हणून नेते भिंत बांधतात, रोहित पवारांचा भाजपला टोला
Follow us
| Updated on: Feb 16, 2020 | 10:43 PM

मुंबई : “आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नेते आपल्याकडे आल्यावर त्यांना काही गोष्टी दिसू नये म्हणून आपल्याकडचे नेते भिंत बांधतात, पण मला तसं करायचं नाही”, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी भाजपला लगावला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 24 आणि 25 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते अहमदाबादलादेखील भेट देणार आहेत. त्यामुळे अहमदाबादमध्ये त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरु आहे. अहमदाबाच्या रोडवर डोनाल्ड ट्रम्प यांची रॅली काढली जाणार आहे. या रोडलगत काही भागात झोपड्या आहेत. त्या झोपड्या दिसू नये म्हणून अहमदाबाद महापालिका 600 मीटर उंचीच्या भींत उभारत आहे. याच गोष्टीचा धागा पकडत रोहित पवार यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली (NCP MLA Rohit Pawar) .

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत भाजपवर टीका केली.”आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नेते आपल्याकडं आल्यावर त्यांना काही गोष्टी दिसू नये म्हणून आपल्याकडचे नेते भिंत बांधतात, पण मला तसं करायचं नाही. उलट भिंतीचा अडसर दूर करून कर्जत-जामखेडमधील नैसर्गिक आणि ऐतिहासिक ठेवा सर्वांपर्यंत पोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. त्याचीच ही झलक अवश्य पहा”, असं फेसबुक पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.