नगरसेवकाने फाईल पळवली, पकडण्यासाठी सभागृहात भागमभाग, अकोला मनपात राड्याची परंपरा

अकोला मनपाची सर्वसाधारण सभा आज संपन्न झाली. या सभेत शिवसेनेचे राजेश मिश्रा यांनी विषय पत्रिकेची फाईल पळवल्याने चांगलाच गोंधळ उडाला. (Ruckus in General Body Meeting Akola Municipal Carporation )

नगरसेवकाने फाईल पळवली, पकडण्यासाठी सभागृहात भागमभाग, अकोला मनपात राड्याची परंपरा

अकोला : अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मनपाची सर्वसाधारण सभा आज संपन्न झाली. या सभेत शिवसेनेचे राजेश मिश्रा यांनी विषय पत्रिकेची फाईल पळवल्याने चांगलाच गोंधळ उडाला. ही फाईल घेण्याकरिता अन्य नगरसेवकांमध्ये रस्सीखेच सुरु असलेली पाहायला मिळाली. त्यामुळे अकोला मनपात राड्याची परंपरा आजही टिकून राहिली. (Ruckus in General Body Meeting Akola Municipal Carporation)

नेहमीप्रमाणे विरोधकांनी या सभेत आरोप प्रत्यारोप करीत गोंधळ घातला. गुंठेवारीच्या प्रश्नाकडे नागरिकांचे लक्ष लागले असताना हा प्रश्न चर्चेविनाच गोंधळातच मंजूर करण्यात आला.

मागील सभेच्या नावाखाली मंजूर करण्यात आलेल्या विषयांची सभेत माहिती देण्याच्या मागणीवरुन शिवसेनेचे नगरसेवकांसह गटनेते राजेश मिश्रा व सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठनेते माजी महापौर विजय अग्रवाल यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाल्यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीच्या सदस्यांनी महापौरांपुढे एकत्रीत येत घोषणाबाजी सुरु केली.

यावेळी शिवसेनेचे राजेश मिश्रा यांनी विषय पत्रिकेची फाईल पळविल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता. ही फाईल घेण्याकरता एक प्रकारे स्पर्धा सुरु होती. त्यानंतर या गोंधळातच महापौरांनी विषय सुचिवरील सर्व विषय मंजूर झाल्याचे जाहीर करीत राष्ट्रगीताला सुरवात केली. अवघ्या काही मिनिटातच ही सभा संपल्याने विरोधकांनी यावर आक्षेप घेतला. असंच चित्र मनपाच्या प्रत्येक सभेत दिसून येते. सभवेळी गदारोळ करून विषय मंजूर करून घेण्यात येतात.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात शासनाच्या गाईडलाईन्सचे पालन व्हावे याकरता मनपाची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. कोरोना व्हायरसचे संक्रमण पाहता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, व इतर नियमांचे पालन करण्याच्या उद्देशानेच नियोजन भवनात सभा आयोजित करण्यात आली असली तरी सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधी नगरसेवकांनी सर्वच नियम पायदळी तुडवले.

बहुतांश नगरसेवकांच्या तोंडाला मास्क नव्हते तर गोंधळादरम्यान सोशल डिस्टसिंगची ऐसी तैसी करण्यात आली. लोकप्रतिनिधी जेव्हा नियम मोडत असतील तर, सर्वसामान्यांनी कुणाचा आदर्श घ्यावा असा प्रश्न उपस्थितांना पडला. (Ruckus in General Body Meeting Akola Municipal Carporation)

संबंधित बातम्या

Akola Cylinder Explosion | अकोलाच्या हिंगणीत सिलेंडरचा स्फोट, स्फोटामुळे तीन घरांचे नूकसान

भारतातील सर्वाधिक तापमानांच्या शहरात अकोला दुसऱ्या क्रमांकावर, टॉप 10 शहरं कोणती?

अकोला | राज्यातले कामगार सरकारवर नाराज

अकोला जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 252 वर, एका दिवसात 32 पॉझिटिव्ह 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *