BLOG: स्वत:ची इतरांशी तुलना करण्याचा धोका

आपण इतरांच्या तुलनेत जास्त चांगलं असावं, असं वाटणं हे जरी नैसर्गिक असलं, तरी असं नेहमी तुलना करून आपण नेहमी स्वतःला इतरांच्या तुलनेत कमी लेखतो. मात्र, असं करुन आपण स्वतःचं नुकसान तर करत नाहीत ना, हे बघितलं पाहिजे.

BLOG: स्वत:ची इतरांशी तुलना करण्याचा धोका
Follow us
| Updated on: Apr 05, 2020 | 7:35 PM

“नाही माझा आवाज इतका पण छान नाही. माझ्यापेक्षा तिला जास्त छान गाणं येतं, मी नाही म्हणणार गाणं.” “तो माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे”, “ती माझ्यापेक्षा खूप जास्त सुंदर आहे त्यामुळे तिच सिलेक्ट होणार.” अशी नेहमीच तुलना आपण करत राहतो. याचा अनेकदा त्रासही होतो, बरोबर ना? (Risk of Comparison Art of Thinking clearly)

आयुष्यात बाह्य आणि वरवरच्या गोष्टींपेक्षा अंतरातील गोष्टी जास्त महत्वाच्या असतात. “लोकं कशी वागतात?” या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नावर अमेरिकेतील सगळ्यात मोठे बिसनेसमेन ‘वॉरेन बफे’ म्हणतात; की हे ज्या-त्या व्यक्ती जवळ असणाऱ्या त्यांच्या गुणपत्रिकेवर अवलंबून आहे.  ती गुणपत्रिका आंतर (Inner Scorecard) आहे की बाह्य (outer scorecard) यावरच सगळं विसंबून आहे.

आता आंतर-बाह्य म्हणजे नेमकं काय? तर हे समजून घेण्यासाठी वॉकेन बफे काही सोप्पे प्रश्न विचारतात. 1. समजा तुम्ही जगातले सगळ्यात जास्त प्रेमळ आणि लोकांची काळजी घेणारे व्यक्ती आहात आणि इतर लोकांच्या मते तुम्ही अतिशय निष्काळजी आणि अजिबात प्रेमळ नसलेले व्यक्ती आहात. किंवा याउलट तुम्ही निष्काळजी आणि प्रेमळ नसलेले व्यक्ती आहात तरी लोकं तुम्हाला प्रेमळ आणि काळजी करणारे व्यक्ती समजतात.

इतरांसोबत आपली तुलना करुनच लोकं आपल्याला, आपल्या वागणुकीला  हवं तसं वळवू शकतात. ही तुलना बहुतेक वेळा तुमच्यात आणि इतरांमध्ये असते. काही वेळा  ही तुलना अनुवांशिक बाबतीत असते. म्हणजे आपण जास्त उंच असावं किंवा इतरांपेक्षा आपले केस जास्त लांब असावे असं वाटणं. पण त्याहीपेक्षा जास्त ते या बाबतीत असतं की इतर लोकांना ज्या गोष्टी जमतात त्या आपल्यालाही जमाव्या किंवा ती क्षमता आपल्यात सुद्धा असावी. म्हणजे मायरा तुमच्यापेक्षा चांगलं लिहिते किंवा अरबाज तुमच्यापेक्षा जास्त चांगली नाती जपू शकतो. तर काही वेळेला तुलना ही प्रेरणादायी ठरु शकते, पण काही वेळेला ती विनाशकारी देखील ठरु शकते.

तुम्ही ठरवलं तर काहीही होऊ शकता. पण तुम्ही एकाच वेळी सर्वकाही होऊ शकत नाही. जेव्हा आपण तुलना करत असतो, तेव्हा कदाचित आपण एक घोटाळा करत असतो. म्हणजे इतरांमधल्या सगळ्यात बेस्ट गोष्टीची तुलना कदाचित आपण आपल्यातल्या त्या मानाने अॅव्हरेज गोष्टीशी करत असतो. हे असं झालं की माशाच्या पोहण्याची तुलना त्याच्या झाड चढण्याच्या क्षमतेसोबत करणे किंवा डावखुरे असताना उजव्या हाताने एखादे वाद्य वाजवण्याची तुलना करणे.

 आपण इतरांच्या तुलनेत जास्त चांगलं असावं, असं वाटणं हे जरी नैसर्गिक असलं, तरी असं नेहमी तुलना करून आपण नेहमी स्वतःला इतरांच्या तुलनेत कमी लेखतो. मात्र, असं करुन आपण स्वतःचं नुकसान तर करत नाहीत ना, हे बघितलं पाहिजे. इतरांबरोबरची तुलना ही दुसरं तिसरं काही नसून आयती-वायती दुःखाची रेसिपी असते.

या तुलनेमुळे अजून काय होतं? समजा एखाद्या व्यक्तीला तुमच्यापेक्षा एखादी गोष्ट जास्त चांगली जमते. या गोष्टीमुळे तुम्हाला त्याच्याबद्दल खूप ईर्ष्या (jealousy) वाटते आणि मग त्याच्यातली ती चांगली गोष्ट आपल्याला यावी यासाठी प्रयत्न करण्याऐवजी आपण त्या व्यक्तीला कमी लेखण्यासाठी किंवा त्याला मागे खेचण्यासाठी आपली शक्ती खर्च करत असतो. असं करुन आपण स्वतःहून नकारात्मकता ओढवून घेत असतो.

“The impact of personal and social comparison information about health risk” या डेव्हिड फ्रेंच यांच्या एका संशोधन पेपरमध्ये या तुलनेमुळे माणसावर होणाऱ्या भावनिक आणि संज्ञानात्मक अशा नकारात्मक प्रभावाचा आढावा घेतला आहे.

यापेक्षा जर स्वतःची तुलना स्वतःशीच केली तर काल मी जे होती/होतो किंवा आज जे आहे त्यापेक्षा उद्या अजून स्वतःत चांगला बदल कसा घडवून सुधारणा करू शकेल यावर काम करता येतं. यामुळे तुमची शक्ती आणि सगळे प्रयत्न फक्त तुम्हाला स्वतःला अजून चांगली व्यक्ती होण्यासाठीच खर्च होतील आणि ज्याचा तुम्हालाच फायदा होईल. यामुळे स्वतःला टेन्शन फ्री, आनंदी ठेवण्यासाठी देखील मदत होईल.

आपल्या सगळ्यांसाठी फेसबुकचे सोंग काही नवीन नाही. फेसबुकवर वेगवेगळी लोकं स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील रोजच्या घडामोडींचं प्रदर्शन करत असतात. कधी आपण इतरांपेक्षा किती सुंदर, फिट आहे त्याचं, कधी आपल्याला इतरांपेक्षा किती जास्त मित्र-मैत्रिणी/फॉलोअर आहेत याचं, कधी आपल्या मोठ्या पार्टीजचं, कधी आपल्याकडे असणाऱ्या गाडी, बंगला इत्यादी भौतिक गोष्टींचं तर कधी आपण इतरांपेक्षा किती जास्त आनंदी आणि सुखी आहोत याचं.

2016 मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार असे लक्षात आले की फेसबुक सारख्या माध्यमांवर स्वतःची इतरांशी सतत तुलना केल्यामुळे लोकं नैराश्येच्या गर्ततेत सापडतात. या सगळ्यामुळे बऱ्याचवेळा त्यांना भयंकर मानसिक आजाराला देखील सामोरं जावं लागतं. लँकेस्टर युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी फेसबुक आणि नैराश्यातला दुवा निश्चित करण्यासाठी 15 वर्षांवरील  35000 लोकं सहभागी असलेल्या 14 देशांमधील अभ्यासांची तपासणी केली. त्यांना आढळलं की वारंवार फेसबुक वापरणारे स्वत:ची तुलना बर्‍याचदा इतरांशी करतात. त्यामुळे ओव्हरथिंकिंग आणि अफवा येऊ शकते. यामुळे नैराश्याच्या भावना उद्भवू शकतात. हे महिला फेसबुक वापरकर्त्यांमध्ये सामान्यपणे दिसलं आहे.

अभ्यासामध्ये असंही दिसून आलं आहे की आपल्या फेसबुक मित्रांबद्दल ईर्ष्या वाटणे किंवा आपल्या सामाजिक नेटवर्कमध्ये माजी प्रेयसी/प्रियकर (past girlfriend/boyfriend) परत जोडण्याचा चुकीचा निर्णय घेतल्यास नैराश्याचे धोका वाढू शकतो. याव्यतिरिक्त, नकारात्मक सामाजिक तुलना करणे आणि वारंवार नकारात्मक स्थिती कायम पोस्ट करणे देखील औदासिन्याचे अनुमानकर्ते असल्याचं आढळलं.

अमेरिकेतील एक मोठे व्यक्तिमत्व आणि बिजनेसमेन चार्ली मुंगर 2007 मध्ये एका कायदा महाविद्यालयाच्या ठिकाणी केलेल्या आपल्या भाषणात चांगलं व्यक्ती बनून अधिक चांगलं आयुष्य कसं जगायचं यात सुद्धा इतरांशी तुलना न करता स्वतःशीच स्वतःची तुलना करुन चांगलं आयुष्य जगण्यासाठीचे संदर्भ देतात.

आता वॉरेन बफे यांनी आंतर आणि बाह्य गुणपत्रिकेबद्दल काय सांगितलेलं ते परत एकदा पाहू. तर लोकांनी त्यांच्या, तुमच्याकडून ठेवलेल्या कित्येक अपेक्षांच्या चष्म्यातून तुम्ही जर स्वतःचे मोजमाप करत असाल. म्हणजेच outer-scorecard तर त्यात तुमच्या नुकसानीपलीकडे अजून काहीही नाही. पण त्याऐवजी जर तुम्ही तुमच्या inner scorecard वर लक्ष केंद्रित करून स्वतःमध्ये सुधारणा करत असाल तर स्वतःची तुलना इतरांशी करून स्वतःसाठीच मोठा धोका निर्माण करण्यापासून तुम्ही वाचाल.

विल्यम हेनरी “बिल” हे मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक व मालक तसेच जगातील सगळ्यात जास्त यशस्वी व्यक्तींपैकी एक व्यक्तिमत्व. ते काय म्हणतात पाहू.

“जेव्हा तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी करतात तेव्हा तुम्ही स्वतःचाच अपमान करत असता.”

जगातील अनेक यशस्वी व्यक्ती त्यांच्या यशामागचे रहस्य सांगताना नेहमीच हे नमूद करतात की त्यांनी स्वतःची तुलना इतरांशी न करता ती फक्त स्वतःशी केली आणि त्यामुळे आज ते इतके यशस्वी होऊ शकले. मग आता यावरुन तुम्हीच ठरवा की इतरांशी तुलना करून उगाच त्रासात आयुष्य घालवायचं की कालच्या तुलनेत आज मी अजून चांगली व्यक्ती कशी होईल या स्वत:च्या प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकायचं?

संबंधित ब्लॉग :

BLOG: मोदी-शाह मिसकॉल द्यायला का सांगताय?

BLOG: अपयशी स्वप्नांच्या स्मशानभूमीमध्ये अधूनमधून चक्कर मारायला हवी

BLOG: तथ्यप्रियता – भाग 1 : वाढती दरी

BLOG: तथ्यप्रियता – भाग 2 : गौरवशाली भूतकाळाचा भांडाफोड

BLOG: तथ्यप्रियता – भाग 3 : लोकसंख्येचा विस्फोट टाळायला गरीब लोक जगवावेत की नाही?

BLOG: स्पष्टपणे विचार करण्याची कला : सरळरेषीय पूर्वग्रह : तुम्ही एक कागद सातवेळा दुमडू शकता?

Risk of Comparison Art of Thinking clearly

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.