...तर आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ : सदाभाऊ खोत

एखाद्या प्रकरणाची भीती घालून जर कोणी मला थांबवायचा प्रयत्न करत असेल, तर आम्ही थांबणाऱ्यांपैकी नाही," असेही खोत यांनी (sadabhau khot on kadaknath scam) म्हटलं.

...तर आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ : सदाभाऊ खोत

सांगली : “स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडल्यापासून काही लोकं माझं राजकीय आयुष्य संपवण्याचं कट कारस्थान करत आहेत. कडकनाथ घोटाळा प्रकरणात आमच्या विरोधात पुरावे द्यावेत, आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ,” असे वक्तव्य माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी (sadabhau khot on kadaknath scam) केले. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले.

“जर आमच्या विरोधात पुरावे असतील तर पोलिसांना द्या. आम्ही चौकशीला सामोरे जायला तयार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि माझ्यात वाद असेल. तर तो आपल्या पुरता असावा. पण शेट्टी हे विनाकारण माझ्या कुटुंबियांना मध्ये घेत आहेत,” असे सदाभाऊ खोत म्हणाले.

“आमच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती, कडकनाथ कोंबडी संस्थेशी संबंधित नाही. त्या प्रकरणाशी आमचा संबंध नाही. काही लोक सदाभाऊ यांना राजकारणातून संपवण्याच्या उद्देशाने आंदोलन करत आहेत. अशा पद्धतीने अडवून एखाद्या प्रकरणाची भीती घालून जर कोणी मला थांबवायचा प्रयत्न करत असेल, तर आम्ही थांबणाऱ्यांपैकी नाही,” असेही खोत यांनी (sadabhau khot on kadaknath scam) म्हटलं.

“काही हितचिंतक आहेत. त्यांना वाटते की आम्ही तुरुंगात गेलो पाहिजे. आम्ही 30 वर्षापासून तुरुंगाच्या वारी केल्यात तुरुंगात जाण्याची चिंता आम्हाला नाही. पण खोटे आरोप करून पोळी भाजू नका,” अशी टीकाही सदाभाऊ खोत यांनी केली.

“राजू शेट्टी तुम्हाला पाच काय 25 वर्ष हातकणंगले मतदारसंघातून संधी मिळणार नाही. सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम हे जर कडकनाथ घोटाळ्याची चौकशी करून कारवाई करणार असतील तर त्यांना हार्दिक शुभेच्छा. त्यांनी अन्य सर्वच घोटाळ्याची चौकशी करावी,” असेही माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले.

राजू शेट्टी यांनी शिखर बँकेविरोधात आंदोलन केले. त्या शिखर बँकेतील घोटाळ्याचं पुढे काय झालं याच उत्तर द्यावे. शिखर बँक प्रकरणात आणि साखर कारखाने विक्री प्रकरणात राजू शेट्टी हे मॅनेज झाले, शेट्टी हे अनेकवेळा दिशाभूल करून अनेक वेळा स्टेटलमेंट केली, असा आरोप माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी (sadabhau khot on kadaknath scam) केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *