रिंकू राजगुरुला दहावीपेक्षा बारावीत 16 टक्के जास्त गुण

मुंबई : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल (Maharashtra Class 12th Board Results 2019) जाहीर झाला आहे. राज्यातील 85.88 टक्के विद्यार्थी बारावी परीक्षेत पास झाले आहेत. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली. तर कोकण विभाग पुन्हा अव्वल ठरला. मुलींचा निकाल 90.25 टक्के तर मुलांचा निकाल 82.40 टक्के इतका आहे. कोकण विभाग 93.23 …

रिंकू राजगुरुला दहावीपेक्षा बारावीत 16 टक्के जास्त गुण

मुंबई : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल (Maharashtra Class 12th Board Results 2019) जाहीर झाला आहे. राज्यातील 85.88 टक्के विद्यार्थी बारावी परीक्षेत पास झाले आहेत. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली. तर कोकण विभाग पुन्हा अव्वल ठरला. मुलींचा निकाल 90.25 टक्के तर मुलांचा निकाल 82.40 टक्के इतका आहे. कोकण विभाग 93.23 टक्क्यांसह अव्वल, तर नागपूर विभाग 82.51 टक्के निकालासह तळाला राहिला. विद्यार्थ्यांना आज दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येईल.  बोर्डाने आज पत्रकार परिषद घेऊन निकालाबाबतची माहिती दिली.

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरुनेही यंदा बारावीची परीक्षा दिली होती. रिंकूला बारावीत बारावीत 82 टक्के गुण मिळाले आहेत.

आर्चीला दहावीत किती टक्के?

दोन वर्षापूर्वी आर्चीने दहावीची परीक्षा दिली होती. त्यावेळी सैराटची धूम होती. आर्चीला दहावीत 66 टक्के गुण मिळाले होते.

या’ वेबसाईटवर निकाल पाहता येणार 

  1. mahresult.nic.in
  2. hscresult.mkcl.org
  3. maharashtraeducation.com
  4. maharashtra12.jagranjosh.com
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *