रुग्णालयानेच रुग्णांना रस्त्यावर फेकलं, एकाचा मृत्यू

सिव्हील रुग्णालयात दाखल असलेल्या तीन रुग्णांना निर्जन रस्त्यावर फेकल्याचा गंभीर प्रकार घडला. रसत्यावर फेकलेल्या तीन रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला

रुग्णालयानेच रुग्णांना रस्त्यावर फेकलं, एकाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Nov 05, 2019 | 8:55 AM

सागंली : जिल्ह्यातील मिरज तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. येथील सिव्हील रुग्णालयात दाखल असलेल्या तीन रुग्णांना निर्जन रस्त्यावर फेकल्याचा गंभीर प्रकार घडला (Sangli Hospital throws Patients). रसत्यावर फेकलेल्या तीन रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर इतर दोघांवर उपचार सुरु आहेत. या अमानवी प्रकाराने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे (Sangli Hospital throws Patients).

सांगलीतील जुना कुपवाड रस्त्यावर सुंदर पार्क या निर्जन रस्त्यावर तीन मृतदेह आणून टाकल्याची अफवा 2 नोव्हेंबरच्या रात्री दहाच्या सुमारास पसरली (Sangli). त्यामुळे जागरूक नागरिकांनी तिकडे धाव घेतली. तेव्हा ते मृतदेह नसून जीवंत रूग्ण असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. हे तिन्ही रुग्ण उपचारा अभावी निपचित पडले होते.

या तिन्ही रूग्णांना डिसचार्ज देऊन दुसऱ्या रुग्णालयात नेत असल्याचे सांगत मिरज सिव्हीलमधून बाहेर काढण्यात आले (Civil Hospital). त्यानंतर सांगलीच्या निर्जन रस्त्यावर आणून फेकले. प्रतिकार शक्ती नसल्याने ते रूग्ण रस्त्यावर पडून राहिले, अशी माहिती त्या रुग्णांपैकी एकाने दिली.

या रुग्णांची प्रकृती गंभीर होती. त्यातच या रस्त्यावर बेवारस कुत्री त्यांच्यावर हल्ला करण्याचा धोकाही होता. त्यामुळे नागरिकांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फोन करुन माहिती दिली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा मुजावर यांच्या मदतीने त्यांच्याच गाडीतून रात्री अकराच्या सुमारास या तिघांना सिव्हील रुग्मालयात उपचारास दाखल करण्यात आले. मात्र, वेळेवर उपचार न मिळाल्याने या रुग्णांपैकी शिवलिंग कुचनुरे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मिरज सिव्हील रुग्णालयाने फेकून दिलेल्या तीन रूग्णांपैकी एका रूग्णाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने वैद्यकीय पंढरीत खळबळ उडाली आहे. वैद्यकीय पंढरीला काळिमा फासल्या गेल्याच्या या घटनेने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

या रुग्णांसोबत असं अमानवी कृत्य करणाऱ्या रुग्णालय प्रशासनावर आणि डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. शिवलिंग कुचनुरे यांच्या मृत्युला कारणीभूत असलेल्या डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेने अधिष्ठाता यांच्याकडे केली आहे. तसेच, शिवलिंग कुचनुरे यांचं शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यात यावं, अशी मागणी शिवसेना उप जिल्हाप्रमुख काटकर यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.