पोलिसांसोबत नाकाबंदीची ड्युटी, अंगावर ट्रक घालून चालकाने शिक्षकाला चिरडले

नानासाहेब कोरे असं मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकाचं नाव आहे. कोरे हे चेकपोस्टवर पोलिसांना मदतनीस म्हणून कार्यरत होते. (Sangli Truck Driver Crushed Teacher on Duty with Police on check post to death)

पोलिसांसोबत नाकाबंदीची ड्युटी, अंगावर ट्रक घालून चालकाने शिक्षकाला चिरडले

सांगली : पोलिसांच्या मदतीला नाकाबंदीच्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या शिक्षकाला ट्रकचालकाने चिरडून ठार मारले. सांगलीत चेक पोस्टवरुन पळालेल्या ट्रक चालकाने अंगावर भरधाव ट्रक घातल्याने शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. (Sangli Truck Driver Crushed Teacher on Duty with Police on check post to death)

जत तालुक्यातील डफळापूर गावाजवळ असलेल्या नाकाबंदीच्या ठिकाणी आज (मंगळवार 12 मे) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नानासाहेब कोरे असं मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकाचं नाव आहे. कोरे हे चेकपोस्टवर पोलिसांना मदतनीस म्हणून कार्यरत होते.

सिमेंट भरलेला ट्रक काल मध्यरात्री कर्नाटकातून जतकडे निघाला होता. शिंगणापूर नाक्यावर ट्रक न थांबवता चालक पुढे निघाला होता. त्यामुळे नानासाहेब कोरे यांनी ट्रकला थांबण्याचा इशारा केला.

मुजोर चालकाने ट्रक न थांबवता थेट कोरे यांच्या अंगावर घातला. त्यामुळे ट्रकखाली चिरडून गंभीर जखमी झालेल्या नानासाहेब कोरे यांना प्राण गमवावे लागले. आरोपी ट्रक चालक हणमंत रामचंद्र मुरड याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

(Sangli Truck Driver Crushed Teacher on Duty with Police on check post to death)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *