सणासुदीला SBI ची जबरदस्त ऑफर, घर खरेदीदारांना मोठा फायदा

आपल्याला गृह कर्ज स्वस्तात मिळेल. तसेच अशा अनेक आकर्षक योजना आहेत, ज्या आपल्याला लाभदायी ठरणार आहेत.

सणासुदीला SBI ची जबरदस्त ऑफर, घर खरेदीदारांना मोठा फायदा

नवी दिल्लीः जर आपण सणाच्या हंगामात घर विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी आपल्यासाठी फायदेशीर आहे. देशातील सर्वात मोठी भारतीय स्टेट बँक (SBI) सणाच्या हंगामासाठी जबरदस्त ऑफर्स घेऊन आली आहे. आपल्याला गृह कर्ज स्वस्तात मिळेल. तसेच अशा अनेक आकर्षक योजना आहेत, ज्या आपल्याला लाभदायी ठरणार आहेत.(sbi launches new scheme )

प्रक्रिया शुल्कात 100% सूट

सणासुदीच्या हंगामात घर खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी गृह कर्जाच्या प्रक्रिया शुल्कामध्ये एसबीआयने 100 टक्के सूट जाहीर केली आहे. म्हणजेच कोणत्याही गृह कर्जासाठी फायलिंग चार्ज भरण्यासाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

25 बेसिस पॉइंट अतिरिक्त सूट

एसबीआय केवळ 6.90च्या दराने गृहकर्ज देत आहे. परंतु या उत्सवाच्या हंगामात बँकेने 25 बेसिस पॉइंट्सवर अतिरिक्त सूट जाहीर केली आहे. म्हणजेच या वेळी एसबीआयकडून गृहकर्ज घेणा-यांना 6.65च्या दराने व्याज द्यावे लागेल.योनो अॅपवर अन्य सवलत

बँकेने असे म्हटले आहे की, जर ग्राहक SBI योनो अॅपद्वारे गृह कर्ज घेत असल्यास त्याला स्वतंत्रपणे काही सवलती देण्यात येतील. यानुसार एसबीआयकडून कर्ज घेणे खरोखर घर खरेदीदारासाठी फायदेशीर आहे.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

SBI Gold Loan | गोल्ड लोनसाठी बारामतीत एसबीआयची विशेष शाखा, देशातील पहिलाच प्रयोग

कर्जमाफीसाठी 45 ते 51 हजार कोटींची गरज, 50 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ, एसबीआयचा अंदाज

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *