स्कॉर्पिओ आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू, 3 जखमी

एका स्कॉर्पिओ कार आणि ट्रकची धडक झाल्याने भीषण असा अपघात (Scorpio car and Truck accident) झाला.

स्कॉर्पिओ आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू, 3 जखमी

पाटणा : स्कॉर्पिओ आणि ट्रॅक्टरची धडक होऊन भीषण अपघात (Scorpio car and Truck accident) झाला. या अपघातात तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3 जण गंभीर जखमी आहेत. बिहारच्या मुजफ्फरपूर इथं हा भीषण अपघात (Scorpio car and Truck accident) झाला. या अपघातातील जखमींवर पाटण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. समरसपूर गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर ही पहाटे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. भीषण धडकेनंतर  11 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चारजण गंभीर जखमी होते. यामधील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्कॉर्पिओ कारमधून एकूण 14 जण प्रवास करत होते.

स्कॉर्पिओ कार कुठून येत होती हे अजून स्पष्ट झाले नाही. या कारमध्ये लहान मुलं आणि पुरुषांचा समावेश होता. ही कार उत्तर प्रेदशची असल्याचे सांगितलं जात आहे. UP51 Z 4954 असा या कारचा नंबर आहे.

दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत”, असं कांटी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ अधिकारी रविंद्र कुमार यांनी सांगितले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *