प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 'सीड मदर' राहीबाई पोपेरे यांचा मोलाचा सल्ला

कोरोनाच्या लढाईत रोगप्रतिकार शक्तीची कमतरता हाही उपचारात कळीचा मुद्दा ठरत आहे. यावर सीड मदर म्हणून प्रसिद्ध राष्ट्रपती पदक विजेत्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी मोलाचा सल्ला दिला आहे (Rahibai Popere advice for immunity system).

प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 'सीड मदर' राहीबाई पोपेरे यांचा मोलाचा सल्ला

अहमदनगर : कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभरात हाहाकार माजवला आहे. अशातच त्यावर रामबाण उपाय असलेल्या लसचाही शोध लागणेही अजून बाकी आहे. कोरोनाच्या लढाईत रोगप्रतिकार शक्तीची कमतरता हाही उपचारात कळीचा मुद्दा ठरत आहे. यावर सीड मदर म्हणून प्रसिद्ध राष्ट्रपती पदक विजेत्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी मोलाचा सल्ला दिला आहे (Rahibai Popere advice for immunity system). कोरोनाशी सामना करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी गावरान वानांची लागवड करा, असा सल्ला राहिबाई पोपरे यांनी दिला आहे.

राहिबाई पोपेरे म्हणाल्या, “कोणत्याही आजारातून बरे होण्यासाठी प्रत्येकाची प्रतिकार शक्ती उत्तम असणं गरजेचे आहे. संपूर्ण जग कोरोनाचा मुकाबला करतंय. कोरोनाशी सामना करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल, तर गावरान वानांची लागवड करायला हवी. शेतकऱ्यांनी प्राधान्याने गावरान वानांची लागवड करावी. गावरान वाण हा सकस आहार असून तो सर्वांना खाण्यास मिळेल आणि त्यामुळे कठीण आजारांवर मात करणे शक्य होईल.”

अहमदनगरमधील अकोले तालुक्यात कोंभाळणे या आदिवासी गावात राहणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे आपल्या गावातच गावरान वाणांचं जतन करतात. या लॉकडाऊनच्या काळातही त्यांचं हे काम सुरुच आहे. त्यांनी यावेळी नागरिकांना घरातच थांबण्याचंही आवाहन केलं आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली (Maharashtra Corona Update) आहे. राज्यात 22 एप्रिलला नव्या 431 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 649 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजार 683 वर पोहोचला आहे. तर पुणे शहर आणि ग्रामीण भागात एकूण 753 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

दुसरीकडे 22 एप्रिलला राज्यात 18 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला (Maharashtra Corona Update) आहे. यात मुंबईत 10, पुणे 2, औरंगाबाद 2 तर कल्याण डोंबिवली, सोलापूर, जळगाव आणि मालेगावात प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 14 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. यात 18 पैकी 12 रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृत्यूंची संख्या 269 वर पोहोचली आहे.

?राज्यातील एकूण कोरोना रुग्ण – 5649
?आज नवे रुग्ण – 431
?आज मृत्यू – 18 (एकूण 269)
?आज डिस्चार्ज मिळालेले रुग्ण – 67 (एकूण 789)
?मुंबईतील एकूण रुग्ण – 3683
?पुण्यातील एकूण रुग्ण (शहर+ग्रामीण) – 753 (आतापर्यंत मृत्यू- 54)

कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी:

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई95100666335405
पुणे (शहर+ग्रामीण)42092172021152
ठाणे (शहर+ग्रामीण)65324295481769
पालघर 102265223202
रायगड91104222167
रत्नागिरी91662432
सिंधुदुर्ग2622205
सातारा1855107169
सांगली64838519
नाशिक (शहर +ग्रामीण)76634435306
अहमदनगर (शहर+ग्रामीण)98056426
धुळे161086478
जळगाव 63553661361
नंदूरबार 28216711
सोलापूर44782233357
कोल्हापूर 132283120
औरंगाबाद86594489345
जालना108458047
हिंगोली 3442862
परभणी2271197
लातूर 75835037
उस्मानाबाद 41025117
बीड2411245
नांदेड 63925427
अकोला 1900154795
अमरावती 91664737
यवतमाळ 46929814
बुलडाणा 42021617
वाशिम 2531105
नागपूर2156140423
वर्धा 44141
भंडारा175902
गोंदिया 2171623
चंद्रपूर1841020
गडचिरोली136711
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)210031
एकूण2,67,6651,49,00710,695

संबंधित बातम्या :

देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांची घोषणा, सुरेश वाडकर, राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री

मुंब्र्यात तब्लिगींवर मोठी कारवाई, 25 जण अटकेत, मलेशिया, बांगलादेशींचा समावेश

ड्युटीवरील पोलिसाला कोरोना झाल्यास 10 हजार रुपयांची मदत, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पुढाकार

Rahibai Popare advice for immunity system

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *