अहमदनगरमध्ये शरद पोंक्षे यांच्या गाडीची काच फोडली

काही अज्ञात व्यक्तींनी अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe car glass smashed) यांच्या गाडीची काच फोडली.

अहमदनगरमध्ये शरद पोंक्षे यांच्या गाडीची काच फोडली
Follow us
| Updated on: Mar 09, 2020 | 7:46 PM

अहमदनगर : काही अज्ञात व्यक्तींनी अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe car glass smashed) यांच्या गाडीची काच फोडली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि शरद पोंक्षे हे आज अहमदनगरला गेले होते. यावेळी ही घटना घडली (Sharad Ponkshe car glass smashed). या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गाडीची काच फोडली त्यावेळी शरद पोंक्षे एका हॉटेलमध्ये होते.

आगामी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अहमदनगरमध्ये होणार असल्याची माहिती देण्यासाठी शरद पोंक्षे अहमदनगरला गेले होते. नाट्य संमेलनाबाबत माहिती देण्यासाठी अहमदनगर शहरातील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद सुरु होती. हॉटेलबाहेर प्रसाद कांबळी यांच्या गाडीत शरद पोंक्षे यांची बॅग होती. याच गाडीच्या ड्रायव्हरच्या बाजूची काच काही अज्ञात व्यक्तींनी फोडली.

गेल्या आठवड्यात पुण्यातील एका कार्यक्रमात शरद पोंक्षे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यामुळे शरद पोंक्षे यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. त्यांच्या याच वक्तव्याच्या रोषातून गाडीची काच फोडण्यात आल्याची चर्चा अहमदनगर शहरात सुरु आहे. मात्र, गाडीचा काच फोडणाऱ्यांचा पोंक्षे यांच्यावरील रोष होता की त्यांची बॅग चोरीचा उद्देश होता? हे समजू शकलेलं नाही.

शरद पोंक्षे यांनी काय वक्तव्य केलं होतं?

“स्वातंत्र्यवीर सावरकर याचं अस्पृश्यता निवारण्यात मोठं योगदान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे. आंबेडकर आणि महात्मा फुले हे त्या त्या जातीत जन्माला आल्याने त्यांना अपमानाचे चटके बसले. त्यामुळे विद्रोह करत प्रवाहाविरोधात लढले. मात्र अपमानाचा कोणताही चटका बसला नसतानाही सावरकर ब्राह्मण विरोधात उभे राहतात. समाजातील जातीच्या भिंती फोडण्यासाठी आयुष्य व्यतीत करतात. त्यामुळे दोन्ही राष्ट्रपुरुषांपेक्षा सावरकर कांकणभर श्रेष्ठ” असा दावा पोंक्षे यांनी केला होता.

संबंधित बातमी : अस्पृश्यता निवारणात आंबेडकर आणि फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ : शरद पोंक्षे

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.