गुलाबराव पाटील टी शर्टवर, सरनाईंकाचा झक्कास गॉगल, शिवसेना आमदार बीचवर!

सत्तासंघर्ष सुरु असताना शिवसेनेचे (Shiv sena MLA on Madh Island) सर्व आमदार एक गठ्ठा फिरत आहेत. परवा हॉटेलवर जमलेले शिवसेना आमदार काल रंगशारदा सभागृहात दाखल झाले.

गुलाबराव पाटील टी शर्टवर, सरनाईंकाचा झक्कास गॉगल, शिवसेना आमदार बीचवर!

मुंबई : सत्तासंघर्ष सुरु असताना शिवसेनेचे (Shiv sena MLA on Madh Island) सर्व आमदार एक गठ्ठा फिरत आहेत. परवा हॉटेलवर जमलेले शिवसेना आमदार काल रंगशारदा सभागृहात दाखल झाले. तिथे उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनानंतर शिवसेना आमदारांना (Shiv sena MLA on Madh Island) मालाडमधील हॉटेलवर हलवण्यात आलं. शिवेसना आमदार आज रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहेत. कारण सेनेचे आमदार मढ बीचवर फिरायला गेले. आमदार प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील, यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी मढ बीचवर आनंद घेतला. शिवाय कार्यकर्त्यांसोबत सेल्फीही काढून आमदार फोटोसेशन करत आहेत.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा आणखी मजबूतपणे मांडला. देवेंद्र फडणवीस यांनी काल राजीनामा देऊन पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेनेने भाजपशी संपर्क न करता केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीशीच संपर्क केल्याचा आरोप केला. तसंच अडीच अडीच वर्षांचा मुख्यमंत्री असं काहीही ठरलं नव्हतं, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यानंतर उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप केला. कारण लोकसभा निवडणुकीपूर्वी युती झाली त्यावेळी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याच समोर मुख्यमंत्रिपदाच्या अटी ठरल्या होत्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच भाजपने ठाकरेंवर खोटारडेपणाचा आरोप करण्यापेक्षा स्वत:चा इतिहास तपासावा असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी केला होता.

या सर्व पार्श्वभूमीनंतर शिवसेना आमदार फुटू नये म्हणून शिवसेनेकडून खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळेच शिवसेनेने सर्व आमदारांना एकत्र ठेवून त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *