महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच, महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा बदलला पाहिजे : संजय राऊत

शिवसेना-भाजपमधील सत्तास्थापनेच्या तणावामध्ये संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut PC) आक्रमकपणे शिवसेनेची बाजू लावून धरत आहेत.

महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच, महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा बदलला पाहिजे : संजय राऊत
Follow us
| Updated on: Nov 05, 2019 | 10:02 AM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut PC) यांच्या मॅरेथॉन पत्रकार परिषदा सुरुच आहेत. शिवसेना-भाजपमधील सत्तास्थापनेच्या तणावामध्ये संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut PC) आक्रमकपणे शिवसेनेची बाजू लावून धरत आहेत. संजय राऊत यांनी आजही पत्रकार परिषद घेऊन, काल घेतलेल्या राज्यपालांच्या भेटीसंदर्भात माहिती दिली.  मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, हे संजय राऊत यांनी आजही छातीठोकपणे सांगितलं. मात्र त्याचवेळी राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा बदलला पाहिजे, असं म्हणत, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

संजय राऊत आणि सेना नेते रामदास कदम यांनी काल राज्यपालांची भेट घेतली. याबाबत राऊत म्हणाले, “काल राज्यपालांसोबत राज्यातील परिस्थितीबाबत बोललो आहोत. आमची भूमिका मांडली. रोज बोलणं आता योग्य नाही. महाराष्ट्र राजकारणाचा चेहरा बदलला पाहिजे. सरकार लवकर स्थापन होईल. मुख्यमंत्री सेनेचा होईल”.

सर्व पक्षाचे नेते प्रयत्न करत आहेत. सर्वांची भूमिका आता महत्वाची आहे. महाराष्ट्राचा निर्णय हा महाराष्ट्रात होईल. महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार यावं हे पवारांना आणि काँग्रेसच्या नेत्यांना वाटतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुद्धा स्थिर सरकार हवं आहे. दिल्लीत काय झालं मला माहित नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

मी पक्षासाठी बोलतोय , पक्षप्रमुखांना खोटं ठरवलं जात आहे. जे ठरलं होतं यावर कोणी बोलत नाही. कोणीही टीका करु दे, जनतेला सर्व माहीत आहे.

शरद पवारांसोबत आता काही बोलणं झालं नाही. पण जर बोललो तर अपराध आहे का? जे कोणी पवारसाहेबांसोबत बोलत आहेत हे आम्हाला माहीत आहे. फक्त आम्ही बोललो की दिसतं, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं. शपथ ग्रहण होईल आणि राज्यावर जे ग्रहण लागलं आहे ते सुटेल, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या 

‘तरुण भारत’ माहित नसणारे संजय राऊत ‘अधू दृष्टीचे’, मुखपत्रांमध्ये कलगीतुरा 

VIDEO: ‘ती’ फाईल दुर्दैवाने समोर आली, लवकरच खुलासा होईल : संजय राऊत 

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.