खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा, ‘खडसे मोठे नेते, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करावं’, शिवसेनेची खुली ऑफर

भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा सुरु असताना त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी खुली ऑफर मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. (Uday Samant Offer Eknath Khadse To join Shivsena)

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा, 'खडसे मोठे नेते, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करावं', शिवसेनेची खुली ऑफर
Follow us
| Updated on: Oct 07, 2020 | 7:15 PM

रत्नागिरी : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहेत. येत्या 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी खडसे राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. अशातच शिवसेना नेते, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी खडसेंना शिवसेना प्रवेशाची खुली ऑफर दिली आहे. (Shivsena Leader Uday Samant Offer Eknath Khadse To join Shivsena)

“एकनाथ खडसे मोठे नेते आहेत. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी त्यांनी एकेकाळी खूप कष्ट केले आहेत. त्यांच्या भाजप सोडण्याच्या चर्चा होत आहेत. ते जर दुसरा विचार करत असतील तर मला वाटतं त्यांनी शिवसेनेत प्रवेश करुन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करावं”, असं उदय सामंत म्हणाले.

“ज्या व्यक्तीने महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी जिवाचे रान केलं त्या व्यक्तीवर पक्ष सोडण्याची अशी वेळ येणं हे दुर्दैवी आहे”, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाचा किंवा त्यांनी कोणत्या पक्षात प्रवेश करायचा हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे मात्र त्यांनी शिवसेनेत काम करावं, अशी माझी मनापासून इच्छा आहे”, असं सामंत म्हणाले.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा

गेल्या काही दिवसांपासून एकांतवासात असलेले एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. येत्या 10 तारखेला 10 वाजून 10 मिनिटांनी खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

खडसे राष्ट्रवादीत आल्यास स्वागतच, राष्ट्रवादीच्या जळगाव जिल्हाध्यक्षांची भूमिका दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा विस्तार करण्यासाठी खडसेंसारख्या मातब्बर नेत्याचा फायदा होऊ शकतो, अशी अपेक्षा जळगाव जिल्ह्यातील नेत्यांना आहे. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत आले, तर त्यांचे स्वागतच आहे. मात्र, खडसेंचा निर्णय आता पक्षश्रेष्ठीच घेतील, असेही राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील म्हणाले होते.

(Shivsena Leader Uday Samant Offer Eknath Khadse To join Shivsena)

संबंधित बातम्या 

“एकनाथ खडसेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाचा विचार करायला हरकत नाही” 

Eknath Khadse | देवेंद्र फडणवीसांनी माझे तिकीटही कापलं, एकनाथ खडसेंचे गंभीर आरोप   

मला एकाच व्यक्तीने छळले, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस : एकनाथ खडसे 

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.