'महावितरण'विरोधात सेनेच्या तीन आमदारांचं उपोषण

नांदेड : महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. वारंवार मागणी करुनही महावितरण विद्युत डीपी न मिळाल्याने डीपीच्या मागणीसाठी नांदेडमध्ये शिवसेनेच्या तीन आमदारांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे. नांदेड जिल्ह्यात एक हजाराहून अधिक डीपी नादुरुस्त आहेत. या नादुरुस्त डीपीमुळे कृषी पंपांना विद्युत पुरवठा होत नाही. यामुळे शेतकऱ्यांना पाणी असूनही रब्बीची पेरणी करता येत नाही. या …

'महावितरण'विरोधात सेनेच्या तीन आमदारांचं उपोषण

नांदेड : महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. वारंवार मागणी करुनही महावितरण विद्युत डीपी न मिळाल्याने डीपीच्या मागणीसाठी नांदेडमध्ये शिवसेनेच्या तीन आमदारांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे.

नांदेड जिल्ह्यात एक हजाराहून अधिक डीपी नादुरुस्त आहेत. या नादुरुस्त डीपीमुळे कृषी पंपांना विद्युत पुरवठा होत नाही. यामुळे शेतकऱ्यांना पाणी असूनही रब्बीची पेरणी करता येत नाही. या प्रकारामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. त्यामुळे डीपी दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवसेनेच्या तीन आमदारांनी उपोषण सुरु केलं आहे.

नागेश पाटील, हेमंत पाटील आणि सुभाष साबणे या तीन आमदारांसह शेकडो शिवसैनिक उपोषणाला बसले आहेत. महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर तिन्ही आमदारांनी हे उपोषण सुरु केलं आहे. आपली मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरुच राहणार असल्याचे आमदारांनी सांगितलं आहे.

कोण आहेत तीन आमदार?

नागेश पाटील, हेमंत पाटील आणि सुभाष साबणे हे तिन्ही नांदेड जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते आहेत. हे तिन्ही आमदार शिवसेनेचे मराठवाड्यातील महत्त्वाचे शिलेदार मानले जातात.

  • नागेश पाटील हे हे हादगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत.
  • हेमंत पाटील नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत.
  • सुभाष साबणे देगलूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत.
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *