तृप्ती देसाई नगरला; ‘तुझी आतुरतेने वाट बघतेय राणी, तुझी लायकी दाखवते’, शिवसेना कार्यकर्तीचं ओपन चॅलेंज

बाई तू लवकर माझ्या गावचा रस्ता धर, मी तुझी आतुरतेने वाट बघतेय राणी. ये, तुझ्या स्वागताची तयारी मी नगर शहरात करुन ठेवली आहे, असं शिवसेना कार्यकर्त्या स्मिता आष्टेकर म्हणतात.

तृप्ती देसाई नगरला; 'तुझी आतुरतेने वाट बघतेय राणी, तुझी लायकी दाखवते', शिवसेना कार्यकर्तीचं ओपन चॅलेंज
Follow us
| Updated on: Feb 18, 2020 | 10:40 AM

अहमदनगर : इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी ‘भूमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाई यांनी केली आहे. तृप्ती देसाई अहमदनगरच्या पोलिस अधीक्षकांना भेटण्यासाठी नगरला रवाना होणार आहेत. त्याआधीच शिवसेनेच्या कार्यकर्त्या स्मिता आष्टेकर यांनी ‘नगरमध्ये येऊन दाखवाच’ असं आव्हान देसाईंना (Shivsena worker challenges Trupti Desai) दिलं आहे.

तृप्ती देसाई काय म्हणाल्या?

इंदोरीकर अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करतात. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी आमचं शिष्टमंडळ अहमदनगरच्या पोलिस अधीक्षकांना भेटणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज्यमंत्री बच्चू कडू हे इंदोरीकरांची बाजू घेतात, हे दुर्दैवी आहे. बच्चू कडू हे महिला आणि बालकल्याण विकास विभागाचे राज्यमंत्री आहेत, हाच एक विनोद आहे. ते वारंवार महिलांचा अपमान करतात, अशी टीका तृप्ती देसाई यांनी ‘टीव्ही9’ शी बोलताना केली.

गुन्हा दाखल झाला की इंदोरीकरांना अटक करण्यात यावी. त्यांनी संपूर्ण महिलावर्गाची माफी मागावी, अशी आमची मागणी आहे. गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इंदोरीकरांविरोधात गुन्हा दाखल करावा. जर तसं झालं नाही, तर येत्या अधिवेशनात त्याविरोधात आंदेलन करणार, असा इशाराही तृप्ती देसाईंनी दिला.

हेही वाचा : इंदोरीकर महाराजांचा शिवजयंतीनिमित्त खास सल्ला, मोशीत जंगी मिरवणूक

दरम्यान, तृप्ती देसाई नगरमध्ये आल्यानंतर राडा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्या स्मिता आष्टेकर यांनी देसाईंना शहरात पाय ठेवून दाखवाच, असं ओपन चॅलेंज दिलं आहे. मात्र शिवसेनेचे नगर शहर अध्यक्ष दिलीप सातपुते यांनी पत्रक काढून आष्टेकरांचा शिवसेनेशी संबंध नसल्याचे स्पष्ट केलं आहे.

स्मिता आष्टेकर काय म्हणाल्या?

‘कोण ती तृप्ती देसाई, माझ्या नगर जिल्ह्यात येणार आहे, असं मी ऐकलं. माझा तिला निरोप आहे, की बाई तू लवकर माझ्या गावचा रस्ता धर, मी तुझी आतुरतेने वाट बघतेय राणी. ये, तुझ्या स्वागताची तयारी मी नगर शहरात करुन ठेवली आहे.’ असं स्मिता आष्टेकर म्हणतात.

‘अगं बाई, तुझ्या डोक्यावर परिणाम झाला का? तू करुन काय राहिली आहेस. सगळा विषय सोडून टाक, सगळं राजकारण बाजूला ठेव. तू माझ्या शनि चौथऱ्यावर, दैवतांवर, महाराजांवर, हिंदू धर्मावर आक्षेप घ्यायला लागली आहेस, या सगळ्या गोष्टी तू चुकीच्या करायला लागली आहेस. तू आल्यावर तुला तुझी लायकी काय आहे, ते ही स्मिता अष्टेकर नगर शहरात त्याच शिवाजी पुतळ्याच्या खाली दाखवेल. स्मिता अष्टेकर आणि हिंदू महिला काय करु शकते हे तुला कळेल’ असा इशाराही अष्टेकरांनी दिला आहे.

आम्ही कोणाच्याही धमक्यांना घाबरत नाही. आम्ही अहमदनगरमध्ये येणारच. दुपारी एक वाजता पोहचणार आहोत, असं तृप्ती देसाई यांनी आष्टेकरांच्या आवाहनानंतर स्पष्ट केलं (Shivsena worker challenges Trupti Desai)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.