मंगलोर एक्सप्रेसने मुंबई ते कणकवली प्रवास केलेला सिंधुदुर्गातील रुग्ण कोरोनामुक्त, दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना (Sindhudurg Corona Patient tested negative) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका कोरोनाबाधितेचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

मंगलोर एक्सप्रेसने मुंबई ते कणकवली प्रवास केलेला सिंधुदुर्गातील रुग्ण कोरोनामुक्त, दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह

सिंधुदुर्ग : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना (Sindhudurg Corona Patient tested negative) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका कोरोनाबाधितेचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे तब्बल 15 दिवसांनी त्याला ओरोस या ठिकाणच्या जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. हा रुग्ण बरा होऊन घरी जात असल्याचे मला समाधान आहे अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे हा कोरोना संसर्गित रुग्ण (Sindhudurg Corona Patient tested negative) आढळला होता. त्याने 19 मार्चला मंगलोर एक्सप्रेसने मुंबई ते कणकवली असा प्रवास केला होता. या रेल्वे गाडीत एस 3 डब्यात कोरोना बाधित रुग्ण होता. या तरुणाला सहप्रवाशाकडून कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यावेळी रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला होता.

या रुग्णाचे रिपोर्ट हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्याला ओरोस येथील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले होते.

हेही वाचा : तळकोकणातही कोरोनाचा शिरकाव, सिंधुदुर्गमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण

यानंतर 14 दिवसांनी त्याचे स्वॅब टेस्ट घेतली असता त्याचे दोन्ही निगेटिव्ह आले. या चाचणीचा अहवाल 3 एप्रिलला मिळाला. मात्र त्यानंतरही पुढचे काही दिवस त्याला निगराणी खाली ठेवण्यात आले होते.

यानंतर आज 9 एप्रिलला त्या डिस्चार्ज देण्यात आला. पुढील 14 दिवस त्याला होम क्वारंटाईन केले आहे.

या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर कणकवलीतील त्या 58 वर्षीय व्यक्तीने डाँक्टर आणि कर्मचा-याचे आभार मानलेत. तसेच नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, मास्कचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी जनतेला केलं आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा हाहा:कार

कोरोना विषाणूने देशासह राज्यात हाहा:कार पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढतच आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 1 हजार 297 वर पोहोचला आहे.

आज मुंबईत 143 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. तर त्यापाठोपाठ पुणे 3, पिंपरी चिंचवड 2, यवतमाळ 1, अहमदनगर 3, ठाणे 1, नवी मुंबई 2, कल्याण डोंबिवली 4, मिरा-भाईंदर 1, वसई विरार 1, सिंधुदुर्ग 1 कोरोना रुग्णांची वाढ झाली (Sindhudurg Corona Patient tested negative) आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *