गायिका कनिका कपूरचा सहावा रिपोर्ट निगेटिव्ह, कुटुंबात आनंदाचे वातावरण

बॉलिवूड गायिका कनिका कपूरचा सहावा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण (Kanika kapoor report negative) आहे.

गायिका कनिका कपूरचा सहावा रिपोर्ट निगेटिव्ह, कुटुंबात आनंदाचे वातावरण

लखनऊ : बॉलिवूड गायिका कनिका कपूरचा सहावा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण (Kanika kapoor report negative) आहे. कनिकावर सध्या लखनऊमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. कनिका लंडनवरुन परतल्यावर तिला कोरोनाची लागण झाली (Kanika kapoor report negative) होती.

“कनिकाचा रिपोर्ट आता निगेटिव्ह आला आहे. पण तिला डिस्चार्ज देण्यापूर्वी आम्ही तिची पुन्हा एकदा तपासणी करु. तिचा रिपोर्ट पुन्हा निगेटिव्ह आला, तर कनिकाला या आठवड्यात आम्ही घरी जाण्याची परवानगी देऊ शकतो”,असं लखनऊमधील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे प्रोफेसर आर. के. धीमान यांनी सांगितले.

कनिका कपूरला 20 मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ती 9 मार्च रोजी लंडनवरुन भारतात परतली होती. त्यानंतर ती कानपूर आणि लखनऊमध्ये एका पार्टीत सहभागी झाली होती. कनिकाला कोरोनाची लागण असताना तिने स्वत:ला आयसोलेट न केल्यामुळे तिच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, देशभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत देशात साडे तीन हजार कोरोना रुग्ण देशात आढळले आहेत. तर राज्यात 500 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *