500 पेक्षा जास्त गुन्हे, अट्टल दरोडेखोराच्या मुसक्या आवळण्यात सोलापूर पोलिसांना यश

500 पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या अट्टल दरोडेखोराला सोलापूर पोलिसांनी अटक केली. फलटण येथील आयडीबीआय बँक फोडण्यात याचा मोठा हात होता.

500 पेक्षा जास्त गुन्हे, अट्टल दरोडेखोराच्या मुसक्या आवळण्यात सोलापूर पोलिसांना यश
Follow us
| Updated on: Mar 11, 2020 | 3:19 PM

सोलापूर : सोलापूर शहर पोलिसांनी 500 ते 600 गुन्हे (Solapur Crime Story) असलेल्या एका महाभाग चोराला अकट केली. राजेंद्र बाबर असे या अट्टल चोराचे नाव आहे. जानेवारी महिन्यात साताऱ्यातील फलटण येथील आयडीबीआय बँक फोडण्यात याचा मोठा हात होता. राजेंद्र (Solapur Crime Story) बाबरवर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात 500 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

राजेंद्र बाबर याच्यावर सोलापूरसह महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आणि अहमदनगर इत्यादी जिल्ह्यात विविध गुन्हे दाखल आहेत. कुख्यात गुन्हेगार असलेल्या राजेंद्र बाबर याच्यावर महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात सुमारे 500 ते 600 दरोडे, जबरी चोरी, घरफोडी, चोरी अशाप्रकराच्या गुन्ह्यांची नोंद आहे.

हेही वाचा : फेसबुकवर चाईल्ड पॉर्न अपलोड, कोल्हापुरात दोघांना बेड्या

सोलापुरातल्या फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरी आणि घरफोडी गुन्ह्यांच्या तपास कामासाठी बाबरचा शोध गेल्या दोन महिन्यापासून सुरु होता. त्याचवेळी हा गुन्हेगार त्याच्या एका साथीदारासह सोलापुरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचत अत्यंत शिताफीने त्याला अटक केली.

या आधी त्याला पकडताना त्याच्या जवळील बेकायदेशीर अग्नीशस्त्रामधून गोळीबार केलेला होता. तसेच, हिसंक आणि क्रुरपणे निसटुन जायचा. त्यामुळे त्याला सुरक्षित पकडणे आणि पळून जाण्याची कोणतीही संधी मिळू नये, हे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, सापळा रचत पोलिसांनी त्याला सोलापुरात अटक केली. यावेळी आरोपी राजेंद्र बाबर आणि त्याचा साथीदार राजकुमार पंडीत विभुते याच्याकडून पोलिसांनी लाखोंचा (Solapur Crime Story) मुद्देमाल जप्त केला. हत्यारे, रोख रक्कम, कार यासंह अनेक साहित्य जप्त करत 55 लाख 57 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल आरोपी बाबर याच्याकडून जप्त करण्यात आला.

दरम्यान, 24 आणि 25 जानेवारी दरम्यान फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयडीबीआय बँक फोडून रोकड आणि सोने तारण असलेले दागिने चोरी केल्याची कबुली बाबर याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी राजेंद्र बाबर, त्याचा भाऊ महेश बाबर, राजकुमार विभुते या तिघांनी मिळुन ही चोरी केल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली.

तिन्ही सराईत गुन्हेगारांनी चेहरा झाकण्यासाठी आणि हाताचे ठसे येऊ नये म्हणून मास्क आणि हॅण्डग्लोजचा वापर केला. आधुनिक कटावणीच्या साह्याने तसेच गाडीच्या जॅकच्या साहाय्याने आयडीबीआय बँकेचे खिडकीचे गज फाकवून अत्यंत कमी वेळात ही चोरी केली होती.

या चोरट्यांनी आधुनिक कटरने कुलूप तोडून आत प्रवेश केला. ऑक्सिजन आणि गॅस कटरच्या सहाय्याने बँकेतील तिजोरीचा दरवाजा कापला. त्यामध्ये सोने तारणासाठी बँकेत जमा असलेले 79 लाख 9 हजार किमतीचे 2 किलो 640 ग्रँम वजनाचे दागिने चोरले होते. या मोठ्या चोरीमुळे साताऱ्यात खळबळ उडाली होती.

आरोपी राजेंद्र बाबर याने केलेल्या गुन्हेगारी कृत्यातून स्थावर मालमत्ता, जमीन, प्लॉट देखील खरेदी केल्याची माहिती उजेडात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अजून देखील काही गुन्हे चौकशीत (Solapur Crime Story) पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

संबंधित बातम्या :

बेडरुममध्ये प्रियकर-प्रेयसी, अचानक आई आल्याने तरुणीची खिडकीतून खाली उडी

सांगलीत आई-वडील, बहिणीची धारदार शस्त्राने हत्या, 58 वर्षीय मुलावर संशय

चंद्रपुरात दारुबंदीनंतर हुक्का पार्लरवर धडक कारवाई, डझनभर हुक्का पॉट जप्त

पोलिसासह तिघांचा विधवेवर बलात्कार, तिघांना अटक

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.