सोलापुरात बापलेकीच्या नात्याला काळिमा, जन्मदात्याचा चिमुरडीवर बलात्कार, आईची तक्रार

आपल्या पतीनेच लेकीवर बलात्कार केल्याची तक्रार महिलेने माढा पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे.

सोलापुरात बापलेकीच्या नात्याला काळिमा, जन्मदात्याचा चिमुरडीवर बलात्कार, आईची तक्रार

सोलापूर : सोलापुरात बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या पित्याने आपल्या पोटच्या आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून नराधम बाप अल्पवयीन मुलीसोबत दुष्कृत्य करत असल्याची फिर्याद पीडित चिमुरडीच्या आईनेच पोलिसात दिली आहे. (Solapur Father rapes daughter)

सोलापुरातील माढा पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहणारी पीडित चिमुरडी इयत्ता दुसरीत शिकते. आपल्या पतीनेच लेकीवर बलात्कार केल्याची तक्रार महिलेने माढा पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून आपला पती आपल्या मुलीवर अत्याचार करत असल्याचा दावा महिलेने केला आहे. 19 फेब्रुवारीला रात्री साडेअकराच्या सुमारास घरी कोणी नव्हतं. मुलगी झोपल्यानंतर पतीने तिला उठवून तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप महिलेने फिर्यादीत केला आहे.

घडलेल्या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन नराधम पित्याने दोन वर्षांपासून मुलीवर अत्याचार केले, असा आरोपही फिर्यादीत केला आहे. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन माढा पोलिसांनी नराधम पित्याला ताब्यात घेतलं आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Solapur Father rapes daughter)

हेही वाचानवरा-बायकोला विवस्त्र केलं, पेट्रोल टाकून अमानुष मारहाण, गुन्हा दाखल

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *