गडचिरोलीतील नक्षली हल्ल्यात बीड जिल्ह्यातील जवानालाही वीरमरण

गडचिरोली : नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात 15 जवान शहीद झाले आहेत. शिवाय चालकाचाही मृत्यू झाला. शहीद जवानांमध्ये मराठवाडा आणि विदर्भातील जवानांचा समावेश आहे. बीडमधील पाटोदा तालुक्यातील तौशिब शेख हे देखील या हल्ल्यात शहीद झाले आहेत. पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाच्या दोन गाड्यांवर नक्षलवाद्यांनी लक्ष्य केलं. महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट […]

गडचिरोलीतील नक्षली हल्ल्यात बीड जिल्ह्यातील जवानालाही वीरमरण
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

गडचिरोली : नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात 15 जवान शहीद झाले आहेत. शिवाय चालकाचाही मृत्यू झाला. शहीद जवानांमध्ये मराठवाडा आणि विदर्भातील जवानांचा समावेश आहे. बीडमधील पाटोदा तालुक्यातील तौशिब शेख हे देखील या हल्ल्यात शहीद झाले आहेत.

पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाच्या दोन गाड्यांवर नक्षलवाद्यांनी लक्ष्य केलं. महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. नक्षलवाद्यांनी काल रात्रीच रस्त्याचं काम सुरु असलेल्या ठिकाणी तब्बल 30 वाहने पेटवून दिली. त्यानंतर आज पुन्हा नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून भीषण हल्ला केला.

शहीद जवान तौशिब शेख हे पाटोदा येथील रहिवासी आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितून ते पोलीस दलात रुजू झाले. त्यांचे वडील आरिफ शेख हे हॉटेल कामगार आहेत, तर आई शेतमजूर आहे. तौसिफ यांना एक भाऊ आहे. ते औरंगाबाद येथे खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहतात. पाटोदा येथील क्रांती नगर येथे त्यांचं घर आहे. तौसिक यांच्या जाण्याने कुटुंबासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

शहीद जवानांची यादी

1) साहुदास मदावी – कुरखेडा- गडचिरोली

2) प्रमोद भोयर –  देसाईगंज- गडचिरोली

3) किशोर बोबाटे- आरमोरी- गडचिरोली

4) योगाजी हालमी- कुरखेडा- गडचिरोली

5) कुरणशाह दुगा- आरमोरी- गडचिरोली

6)लक्ष्मण कोदापे- कुरखेडा- गडचिरोली

7) भूपेश वालोदे-लाखणी- भंडारा

8) नितीन घोरमारे- साकोरा- भंडारा

9) राजु गायकवाड- मेहकर बुलढाणा

10) सर्जेराव खरडे- देउळगाव बुलढाणा

11) दिपक सुरुषे- मेहकर बुलढाणा

12) संतोष चव्हाण-औंधा-हिंगोली

13) तौशिब आरिफ शेख-पाटोदा बीड

14) अमृत भदादे- कुही नागपुर

15) अग्रमन रहाटे-अरणी- यवतमाळ

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.