सोलापूरच्या टेलरकडून मोदींना खास जॅकेट गिफ्ट!

सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॅकेट घालणं सुरु केल्यापासून, देशभरात मोदी जॅकेटची क्रेझ आहे. पंतप्रधानांच्या ड्रेसिंग सेन्सची सर्वत्र चर्चा होत असते. त्यातल्या त्यात जॅकेटचा ट्रेण्ड आला आहे. मोदींनी बुधवारी उत्तराखंडमधील केदारनाथच्या कार्यक्रमात घातलेल्या जॅकेटचा महाराष्ट्राशी संबंध आहे. कारण मोदींनी काल घातलेलं जॅकेट हे सोलापूरच्या टेलरने भेट दिलेलं आहे. त्यामुळेच पंतप्रधानांनी केदारनाथ इथे घातलेलं जॅकेट सध्या …

, सोलापूरच्या टेलरकडून मोदींना खास जॅकेट गिफ्ट!

सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॅकेट घालणं सुरु केल्यापासून, देशभरात मोदी जॅकेटची क्रेझ आहे. पंतप्रधानांच्या ड्रेसिंग सेन्सची सर्वत्र चर्चा होत असते. त्यातल्या त्यात जॅकेटचा ट्रेण्ड आला आहे. मोदींनी बुधवारी उत्तराखंडमधील केदारनाथच्या कार्यक्रमात घातलेल्या जॅकेटचा महाराष्ट्राशी संबंध आहे. कारण मोदींनी काल घातलेलं जॅकेट हे सोलापूरच्या टेलरने भेट दिलेलं आहे.

त्यामुळेच पंतप्रधानांनी केदारनाथ इथे घातलेलं जॅकेट सध्या चर्चेत आहे. सोलापुरातील कापड व्यावसायिक आणि टेलर किरण यज्जा यांनी हे जॅकेट मोदींनी भेट दिलं आहे.

, सोलापूरच्या टेलरकडून मोदींना खास जॅकेट गिफ्ट!

केदारनाथ येथील कार्यक्रमात मोदींनी घातलेले ग्रे रंगाचं जॅकेट किरण यांनी पाठवलं होतं. हे कापड चार हजार रुपये मीटर असून, जॅकेट बनवण्यासाठी जवळपास 15 हजार रुपये खर्च आलं आहे. या जॅकेटसाठी टेरीवूल कापड वापरण्यात आलं आहे.

किरण यज्जा यांनी मोदींना यापूर्वीही एक जॅकेट गिफ्ट केलं होतं. लोकसभा निवडणुकीदरम्यान यज्जा यांनी मोदींना भगव्या रंगाचं जॅकेट पाठवलं होतं. त्यानंतर मोदींनी काल घातलेलं जॅकेट हे यज्जा यांनी पाठवलेलं दुसरं जॅकेट होतं. आपण पाठवलेलं जॅकेट मोदी परिधान करत असल्याने किरण यज्जा आनंदी आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *