स्मार्टफोनमध्ये हाय स्पीड इंटरनेटसाठी खास टिप्स  

मुंबई : सध्या भारतात 4G हाय स्पीड इंटरनेट सेवा कार्यरत आहे. त्यामुळे बहुतांश इंटरनेट युजर्स हे 4G सेवा वापरतात. असं असलं तरी 4G इंटरनेट सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना स्लो इंटरनेट स्पीडच्या समस्येला सामोरं जावं लागतं. यामुळे ग्राहकांना हाय स्पीड इंटरनेट स्पीडचा वापर करता यावा, यासाठी लवकरच भारतात 5G सेवा सुरु होणार आहे. या 5G सेवेमुळे भारतात …

High Speed Internet, स्मार्टफोनमध्ये हाय स्पीड इंटरनेटसाठी खास टिप्स   

मुंबई : सध्या भारतात 4G हाय स्पीड इंटरनेट सेवा कार्यरत आहे. त्यामुळे बहुतांश इंटरनेट युजर्स हे 4G सेवा वापरतात. असं असलं तरी 4G इंटरनेट सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना स्लो इंटरनेट स्पीडच्या समस्येला सामोरं जावं लागतं. यामुळे ग्राहकांना हाय स्पीड इंटरनेट स्पीडचा वापर करता यावा, यासाठी लवकरच भारतात 5G सेवा सुरु होणार आहे. या 5G सेवेमुळे भारतात इंटरनेटच्या स्पीडमध्ये प्रचंड वाढ होणार आहे.

अनेकदा काही ठिकाणी तुमच्या स्मार्टफोनला इंटरनेटला हाय स्पीड मिळतो, तर दुसऱ्या ठिकाणी स्लो स्पीड मिळतो. या कारणामुळे अनेक ग्राहक विविध मोबाईल कंपन्यांचे सिम सतत बदलत असतात. मात्र, तरी देखील त्यांना इंटरनेटच्या स्लो स्पीडबाबतच्या समस्येला सामोलं जावं लागत. इंटरनेटचा स्पीड वाढवण्यासाठी आम्ही तुम्हाला एक भन्नाट उपाय सुचवणार आहे की ज्यामुळे तुमच्या इंटरनेट स्पीड वाढेल.

हाय स्पीड इंटरनेटसाठी काय कराल?

  • स्मार्टफोनच्या नेटवर्क सेटिंगमध्ये जा. सेटिंगमध्ये गेल्यानंतर 2G/3G/4G असे प्रीपेड नेटवर्कचं ऑप्शन दिसेल. या ऑप्शनपैकी 4G किंवा LTE हे ऑप्शनवर क्लिक करा.
  • त्यानंतर नेटवर्क सेटिंगमध्येच एक्सेस पॉईंट नेटवर्क(APN) सेटिंग चेक करा? तसेच या मेन्यूमध्ये डिफॉल्ट सेटिंग सेट करा.
  • हे सर्व करुनही जर इंटरनेटची स्पीड वाढत नसेल तर तुमच्या स्मार्टफोनमधील डेटा ब्राऊजर सेविंग मोड ऑन करा. हे सर्व केल्यानंतर तुमचा इंटरनेट स्पीड वाढेल.
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *