Weather Alert : राज्यात 13 ते 17 ऑक्टोबर कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

भारतीय हवामान विभाग, मुंबई व मंत्रालय नियंत्रण कक्षानं 13 ते 17 ऑक्टोबर कालावधीत राज्यात विजेच्या कडाकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

Weather Alert : राज्यात 13 ते 17 ऑक्टोबर कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबईः राज्यात 13 ते 17 ऑक्टोबर कालावधीत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. भारतीय हवामान विभाग, मुंबई व मंत्रालय नियंत्रण कक्षानं 13 ते 17 ऑक्टोबर कालावधीत राज्यात विजेच्या कडाकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. विशेषतः किनारपट्टीलगतच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच रायगडकरांना सर्व यंत्रणांनी सावध राहण्याचा इशारा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाकडून देण्यात आला आहे. (heavy rains from October 13 to 17)

भारतीय हवामान विभाग, मुंबई व मंत्रालय नियंत्रण कक्ष यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत राज्यात विजेच्या कडाकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. विशेषतः किनारपट्टी लगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा नियंत्रण कक्षाकडून रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व यंत्रणांना सावधानतेचा व सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

विजांचा कडकडाटासह वादळी वारा वाहणार असल्याने मोकळ्या जागेत उभे राहू नये. विजेचे खांब, लोखंडी वस्तू, विद्युत वस्तूंपासून दूर राहावे. अन्नपदार्थ, बॅटरी, पुरेस औषधे, पिण्यासाठी पाणी इतर व्यवस्था करावी, अशा सूचनाही नागरिकांना देण्यात आल्या आहेत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असं आवाहनही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केली आहे.

हवामानातल्या बदलामुळे राज्यावर आसमानी संकट असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे याचं रुपांतर मोठ्या वादळात होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान खात्याकडून (IMD) सांगण्यात आलं आहे. यामुळे आज तब्बल 5 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा (Heavy rain) अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणासोबतच कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि ओडिशामध्ये 13 ऑक्टोबरला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या चक्रीवादळ विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हवामानातील बदलामुळे मंगळवारी तेलंगणात मुसळधार ते अतिमुसळधार (heavy to very heavy falls) पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर कर्नाटक, रायलसीमा, दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुर्गम भागांतही जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर, उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशा आणि विदर्भातील दुर्गम भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

Weather Alert : राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी

(heavy rains from October 13 to 17)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *