पुण्यात मोकाट फिरणाऱ्यांना अद्दल, 5,930 वाहनं जप्त, तर 2,727 जणांवर गुन्हा दाखल

कोरोना नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाला सहकार्य न करता मोकाट फिरणाऱ्यांना पुणे पोलिसांनी चांगलीच अदद्ल घडवली आहे (Pune Police Action on Lockdown violation).

पुण्यात मोकाट फिरणाऱ्यांना अद्दल, 5,930 वाहनं जप्त, तर 2,727 जणांवर गुन्हा दाखल

पुणे : कोरोना नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाला सहकार्य न करता मोकाट फिरणाऱ्यांना पुणे पोलिसांनी चांगलीच अदद्ल घडवली आहे (Pune Police Action on Lockdown violation). पोलिसांनी पुण्यात तब्बल 121 ठिकाणी नाकेबंदी करण्यात केली आहे. तसेच आत्तापर्यंत कलम 188 अंतर्गत 2 हजार 727 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मोकाट फिरणाऱ्या तब्बल 9 हजार 335 नागरिकांना नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर 5 हजार 930 वाहने जप्त केल्याची माहिती, सहपोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी दिली.

शुक्रवारी (3 एप्रिल) एका दिवसात 429 जणांवर 188 कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच 1 हजार 435 नोटीस बजावत 1 हजार 301 गाड्या जप्त करण्यात आल्या. त्याचबरोबर ड्रोनच्या माध्यमातून शहरातील इमारतींच्या टेरेसवर गर्दी करणाऱ्यांवर आतापर्यंत 20 गुन्हे दाखल केले आहेत.  ड्रोनची संख्या वाढवून आणखी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही रविंद्र शिसवे यांनी दिला.


पोलिसांच्या पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनातूनही मोकाट फिरणाऱ्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जाणार आहे.  या माध्यमातूनही दोषींवर गुन्हा दाखल होणार आहे. याव्यतिरिक्त जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी आणि जास्त दराने विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आतापर्यंत 9 जणांवर गुन्हा दाखल केल्याचं शिसवे यांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या :
सोलापूरच्या चिमुकलीकडून वाढदिवसाचा निधी, शाहरुखकडून जागा, ताजकडून हॉटेल, आपण लढाई जिंकणार : मुख्यमंत्री

आतापर्यंत हात जोडलेत, फेक व्हिडीओने महाराष्ट्राच्या एकीला गालबोट लावू नका, अन्यथा… : मुख्यमंत्री

नवी मुंबई एपीएमसीची समिती स्थापन, अखेर द्राक्षांची निर्यात सुरु, तीन दिवसात हजारो टन द्राक्षे युरोपला निर्यात

दादरमध्येही कोरोनाचा शिरकाव, शिवाजी पार्क परिसरात कोरोनाचा रुग्ण

उपचार काय करताय, मरकजवाल्यांना गोळ्या घाला : राज ठाकरे

Pune Police Action on Lockdown violation

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *