आदित्य ठाकरेंच्या लग्नाच्या प्रस्तावालाही स्थगिती : सुधीर मुनगंटीवार

भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकासआघाडी सरकार हे स्थगिती सरकार असल्याची टीका केली.

आदित्य ठाकरेंच्या लग्नाच्या प्रस्तावालाही स्थगिती : सुधीर मुनगंटीवार
Follow us
| Updated on: Feb 25, 2020 | 5:18 PM

मुंबई : भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकासआघाडी सरकार हे स्थगिती सरकार असल्याची टीका केली. तसेच यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या लग्नाच्या प्रस्तावावरही स्थगिती आणल्याचा उपहासात्मक टोला लगावला (Sudhir Mungantiwar on Aditya Thackeray marriage). ते मुंबईत भाजपने महाआघाडी सरकारविरोधात आयोजित केलेल्या राज्यव्यापी एल्गार आंदोलनामध्ये बोलत होते.

भाजपने राज्यभरात विविध ठिकाणी 400 आंदोलनं करण्याची घोषणा केली. त्याचाच भाग म्हणून मुंबईतील आझाद मैदानात एल्गार आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला जातात. आता नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) तुम्हाला समली आहे. मात्र, तुमच्या आजूबाजूला बसलेल्या लोकांनाही हे समजून सांगा.”

“अब की बार अभद्र सरकार”

सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी ठाकरे सरकारवर टीका करताना ‘अब की बार अभद्र सरकार’ अशी घोषणाही दिली. एकीकडे समृद्धी महामार्गात घोटाळा झाल्याचा आरोप करतात. मात्र, शिवसेनेच्या मंत्र्यांनी स्वतः या योजनेत कोणताही घोटाळा झाला नाही असं म्हटलं. समृद्धी महामार्गात घोटाळाा झाला असं फक्त भ्रष्टाचारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसलाच वाटत असल्याचा आरोपही सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

“शिवसेना ही सोनिया सेना”

शिवसेनेवर टीका करताना सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना ही सोनिया सेना असल्याची जहरी टीका केली. ते म्हणाले, “आम्ही काही चुकलो असेल, तर त्यावेळी सरकारमध्ये शिवसेना सुद्धा सोबत होती. या सरकारमध्ये कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. महिलांवर अत्याचार वाढले आहेत. यांच्या निषेधार्थ आम्ही धरणे आंदोलन करत आहोत. राज्यभर हे आंदोलन सुरू आहे.”

महाविकासआघाडीने जी आश्वासनं दिली त्याचं काय झालं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आश्वासनं दिली. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना 25 हजार रुपये हेक्टरी मदत देणार त्याचं काय झालं? ‘क्या हुआ तेरा वादा?’ असाही प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.

‘हे गजनीचे बाप आहेत, यांनी किमान कागदावर तरी लिहावं’

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “गजनीमध्ये आमीर खान विसरायचा. मात्र, हे सरकार गजनीचे बाप आहे. गजनी विसरायचा म्हणून शरीरावर लिहायचा. यांनी शरीरावर लिहू नये, पण किमान कागदावर तरी लिहावे. यांना ब्रेन टॅब्लेट देण्याची गरज आहे.”

ठाकरे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतं पण महिलांना सुरक्षा देत नाही. हिंगणघाटमध्ये एक बहिणीला जाळण्यात आलं. सरकार बघत बसलं आहे. गृहमंत्री अनेक दिवसांनी या ठिकाणी गेले आणि फक्त आश्वासन देऊन आले. हे फक्त ‘अब की बार, बाप लेकाचं सरकार’ आहे, असाही आरोप मुनगंटीवार यांनी केला.

Sudhir Mungantiwar on Aditya Thackeray marriage

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.