VIDEO : माजी मंत्री बनले वाजंत्री, आमदार सुरेश धस जेव्हा ढोल वाजवतात...

बीड : आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस हे कोणत्या ना कोणत्या कारणाने ते सतत चर्चेत राहतात. हरी नारायण आष्टा गावात आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात जोरजोरात ढोल वाजवत असतानाच आमदार सुरेश धस यांनीही वाजंत्री मंडळीत सहभाग घेतला आणि ढोल गळ्यात घालून मोठ्या जल्लोषात ढोल वाजवायला सुरुवात केली. इतर वाजंत्र्यांनीही सुरेश …

VIDEO : माजी मंत्री बनले वाजंत्री, आमदार सुरेश धस जेव्हा ढोल वाजवतात...

बीड : आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस हे कोणत्या ना कोणत्या कारणाने ते सतत चर्चेत राहतात. हरी नारायण आष्टा गावात आज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात जोरजोरात ढोल वाजवत असतानाच आमदार सुरेश धस यांनीही वाजंत्री मंडळीत सहभाग घेतला आणि ढोल गळ्यात घालून मोठ्या जल्लोषात ढोल वाजवायला सुरुवात केली.

इतर वाजंत्र्यांनीही सुरेश धस यांच्या सुरात सूर देत ताशा जोरात वाजवला. सुरेश धस यांचा ढोल वाजवतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या आधीही सुरेश धस यांनी ‘मैं हूँ डॉन’ या गाण्यावर ठेका धरला होता. आता ढोल वाजवल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे.

कोण आहेत सुरेश धस?

सुरेश धस हे भाजपकडून विधानपरिषदेचे आमदार आहेत. भाजपआधी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. 2018 साली राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळे यांचा पराभव करत सुरेश धस विधानपरिषदेवर निवडून गेले. सरपंच ते राज्याचे मंत्री असा आमदार सुरेश धस यांचा राजकीय प्रवास आहे. आक्रमक, सडेतोड आणि लढवय्ये राजकीय नेते म्हणून बीडसह राज्यभर सुरेश धस प्रसिद्ध आहेत.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *