कोरोनावरील महाराष्ट्राचा ‘अॅक्शन प्लॅन’ तयार, राज्यभरात सव्वा नऊ लाख नागरिकांचं सर्वेक्षण पूर्ण

कोरोना नियंत्रणासाठी महाराष्ट्र सरकारने आपला 'अॅक्शन प्लॅन' प्लॅन तयार केला आहे (Containment plan of Maharashtra for Corona prevention).

कोरोनावरील महाराष्ट्राचा 'अॅक्शन प्लॅन' तयार, राज्यभरात सव्वा नऊ लाख नागरिकांचं सर्वेक्षण पूर्ण
Follow us
| Updated on: Apr 03, 2020 | 10:10 PM

मुंबई : कोरोना नियंत्रणासाठी महाराष्ट्र सरकारने आपला ‘अॅक्शन प्लॅन’ प्लॅन तयार केला आहे. त्याच्या अंतर्गत आतापर्यंत राज्यभरात सव्वा नऊ लाख नागरिकांचं सर्वेक्षणाचं काम पूर्ण झालं आहे (Containment plan of Maharashtra for Corona prevention). महाराष्ट्र सरकारने कंटेनमेंट आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ज्या भागात कोरोनाचे 3 किंवा त्यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तेथे क्लस्टर कंटेनमेंट कृती योजना राबवली जात आहे. त्यानुसार बाधित रुग्ण ज्या भागात राहतो तेथून साधारणपणे 3 किलोमीटर पर्यंतच्या भागाचे सर्वेक्षण केले जात आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षणासाठी अशी 292 पथकं तयार करण्यात आली आहेत. पुणे महानगरपालिका क्षेत्रात 413, नागपूर महापालिका क्षेत्रामध्ये 210 पथकं कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत घरोघर सर्वेक्षणाचं काम केलं जात आहे. राज्यभरात सुमारे 18 जिल्ह्यांमध्ये एकूण 2455 पथकं सर्वेक्षणाचं काम करत आहेत. गुरुवारपर्यंत (2 एप्रिल) सुमारे 9 लाख 25 हजार 828 नागरिकांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कंटेनमेंट आराखडा कसा आहे?

ज्या भागात कोरोनाचे 3 किंवा त्यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तेथे क्लस्टर कंटेनमेंट कृती योजना राबवली जात आहे. त्यानुसार बाधित रुग्ण ज्या भागात राहतो तेथून साधारणपणे 3 किलोमीटर पर्यंतच्या भागाचं सर्वेक्षण केलं जातं. त्यासाठी तैनात करण्यात आलेल्या पथकांच्या माध्यमातून घरोघर जावून लोकांचं सर्वेक्षण केलं जातं. सध्या राज्यात कोणत्याही भागात एक कोरोना बाधित रुग्ण आढळला तरी देखील तेथे सर्वेक्षणाचं काम केलं जात आहे, असं आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आलं.

सर्वेक्षण कसं होतं?

कंटेनमेंट झोन निश्चित झाल्यानंतर त्या भागाचा नकाशा तयार केला जातो. त्यातील घरांची संख्या त्याची लोकसंख्या विचारात घेऊन पथके तयार केली जातात. त्यांना विभाग वाटून दिला जातो. सकाळी 8 ते सायंकाळी 4 यावेळात सर्वेक्षणाचं काम केलं जात आहे. पथकातील सदस्य घरोघरी जाऊन नागरिकांना सर्दी, ताप, खोकला, श्वास घेताना होणारा त्रास आदीबाबत माहिती घेतात. लक्षणांनुसार रुग्णांची यादी तयार केली जाते. ती संबंधित आरोग्य अधिकाऱ्याला दिली जाते. ज्या पथकाला जो विभाग नेमून दिला आहे त्याच पथकानं पुढील 14 दिवस दररोज सर्वेक्षण करायचं अशा सूचना देण्यात आल्या आहेत. संशयित रुग्ण आढळल्यास संबंधित आरोग्य अधिकारी मोठ्या रुग्णालयाकडे त्याला पाठवतो.

पथकातील सदस्य

या पथकामध्ये आरोग्य कर्मचारी, एएनएम, हिवताप निर्मूलन कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आवश्यकता भासल्यास नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचा समावेश केला जातो. या पथकामार्फत सर्वेक्षणासोबत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे महत्वपूर्ण कामही केले जाते. शिवाय कोरोनाबाबत जनप्रबोधनचेही काम केले जाते. नागरिकांनी सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. त्यांना योग्य ती माहिती द्यावी. जेणेकरून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठी मदत होईल, असं आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.

कोठे किती पथकं?

मुंबई महापालिका क्षेत्र (पथकांची संख्या 292), पुणे महापालिका (413), पिंपरी चिंचवड महापालिका (38), पुणे ग्रामीण भाग (331), ठाणे जिल्ह्यातील ठाणे महापालिका (140), कल्याण डोंबिवली महापालिका (82), नवी मुंबई महापालिका (169), उल्हासनगर (90), रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिका (65), रत्नागिरी (54), अहमदनगर जिल्हा (15) आणि महापालिका क्षेत्र (25), यवतमाळ (52), नागपूर महापालिका (210), सातारा (182), सांगली (31), पालघर जिल्ह्यातील वसई विरार (70), सिंधुदूर्ग (19), कोल्हापूर महापालिका (6), गोंदिया (20), जळगाव महापालिका (36), बुलढाणा (94), नाशिक ग्रामिण (28) क्षेत्रात सध्या ही सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत.

संबंधित बातम्या :

संबंधित बातम्या :

तब्लिगीमुळे 14 राज्यात धाकधूक, तब्बल 647 जणांना कोरोनाची लागण

तब्लिगीचे 10 जण पुण्यातून फरार झाल्याचं वृत्त, पुणे विभागीय आयुक्तांचा मोठा खुलासा

Corona : मुंबई विमानतळावर तैनात CISF चे 11 जवान कोरोना पॉझिटिव्ह, तब्बल 142 जण क्वारंटाईन

तेव्हा लोकांनी ढोल वाजवले, आता आग लावली नाही म्हणजे झालं : संजय राऊत

मास्क, टेस्टिंग किट, व्हेंटिलेटर्सवरील GST माफ करा, अजित पवारांची केंद्राकडे मागणी

Containment plan of Maharashtra for Corona prevention

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.