‘आंटी’ म्हणणाऱ्या चिमुकल्याला शिवीगाळ, स्वरा भास्करविरोधात तक्रार

चार वर्षांच्या सहकलाकाराला शिवराळ भाषेत संबोधल्यामुळे अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर टीकेची धनी झाली आहे.

'आंटी' म्हणणाऱ्या चिमुकल्याला शिवीगाळ, स्वरा भास्करविरोधात तक्रार
Follow us
| Updated on: Nov 06, 2019 | 8:58 AM

मुंबई : भाजपविरोधी भूमिकेमुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा विषय ठरणारी अभिनेत्री स्वरा भास्करवर पुन्हा एकदा टीकेची झोड उठली आहे. मुलाखतीत आपल्या उमेदीच्या काळातील आठवण सांगताना चार वर्षांच्या सहकलाकाराला शिवराळ भाषेत संबोधल्यामुळे (Swara Bhasker abuses Child) स्वरा सोशल मीडियावर टीकेची धनी झाली आहे. स्वराविरोधात बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोगात तक्रार दाखल झाली आहे.

‘सन ऑफ अबिश’ या चॅट शोमध्ये स्वरा भास्कर आणि कॉमेडियन कुणाल कामरा सहभागी झाले होते. सूत्रसंचालक अबिश मॅथ्यूने स्वराला तिच्या कारकीर्दीची सुरुवात कुठून झाली असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना स्वराने आपण केलेला पहिला चित्रपट प्रदर्शितच झाला नसल्याचं सांगितलं.

‘मी एका जाहिरातीच्या सेटवर गेले होते. दाक्षिणात्य भाषेतील ही साबणाची जाहिरात होती. त्यावेळी एक चार वर्षांचा मुलगा सेटवर होता. तो तिथला स्टार होता. मात्र त्याने मला बघताच आंटी अशी हाक मारली. मी त्याच्या तोंडावर काही बोलले नाही, पण मनात आलं या ***ने माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच मला आंटी म्हटलं’ असं उत्तर स्वराने दिलं.

सचिन, तुला आमच्या #मीटू कथा दिसत नाहीत…

स्वराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर ट्विटराईट्सनी तिच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. #Swara_aunty हा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेण्ड झाला होता. एका एनजीओने बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोगात स्वराविरोधात तक्रार (Swara Bhasker abuses Child) दिल्याचीही माहिती आहे.

याआधी, स्वराची फजिती झालेला एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये चाहत्याने स्वराला सेल्फी घेण्यासाठी जवळ बोलावलं. स्वरा सेल्फीसाठी जवळ गेली आणि हा चाहता म्हणाला, “मॅम, आयेगा तो मोदी ही” लोकसभा निवडणुकांच्या वेळी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.