बुलडाण्यात 94 प्लॉटधारकांना कोट्यवधीचा गंडा, तलाठी निलंबित

महसूल विभागात गेले 17 वर्ष काम करणाऱ्या तलाठ्याने तब्बल 94 प्लॉटचे मूळमालक बदलून त्याची परस्पर विक्री करुन कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले (Talathi plot scam buldana) आहे.

बुलडाण्यात 94 प्लॉटधारकांना कोट्यवधीचा गंडा, तलाठी निलंबित
Follow us
| Updated on: Feb 07, 2020 | 9:16 AM

बुलडाणा : महसूल विभागात गेले 17 वर्ष काम करणाऱ्या तलाठ्याने तब्बल 94 प्लॉटचे मूळमालक बदलून त्याची परस्पर विक्री करुन कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले (Talathi plot scam buldana) आहे. त्यामुळे तलाठी राजेश चोपडे याला निलंबीत करण्यात आले. प्लॉटधारकांची फसवणूक झाल्यामुळे महसूल विभागाने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपी फरार झाला होता. तब्बल एक महिन्यानंतर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश (Talathi plot scam buldana) आलं आहे.

आरोपी बुलडाण्यातील खामगाव शहरात राहतो. राजेश चोपडे हा भाग 1 चा तलाठी म्हणून 2015 पासून कार्यरत होता. तर एकाच महसूल मंडळात 17 वर्षांपासून असल्याने याकाळात त्याने आपल्या साझातील गृहनिर्माण सोसायट्यांनी वितरित केलेल्या प्लॉटचे मालक बदलून त्याजागी आपल्या मर्जीतील व्यक्तींची नावे ऑनलाईन प्रणालीद्वारे टाकली. तसेच शहरातील इतरही काही प्लॉटचे मूळमालक बदलून त्या प्लॉटची परस्पर विक्री केली. हा प्रकार जवळपास 2019 पर्यंत सर्रास सुरु होता. शिवाय महसूल विभागातील शासकीय दस्तावेजाताही खोडतोड चोपडेने केली आहे.

या दरम्यान दोन प्लॉटधारकांनी महसूल विभागाकडे आणि पोलिसांकडे फसवणुकीच्या तक्रारी केल्या. महसूल विभागाने याची चौकशी समितीद्वारे चौकशीकरून अहवाल बनविला आणि वरिष्ठांकडे सादर करताच तलाठी चोपडेला 5 डिसेंबरला तात्काळ निलंबित करण्यात आले. तसेच तहसीलदार यांनी मंडळ अधिकाऱ्यामार्फत पोलिसांत 8 जानेवारीला निलंबित तलाठी यांच्याविरोधात 94 प्लॉटमध्ये गैरप्रकार आणि शासकीय कागदपत्रांची खोडतोड केल्याची तक्रार दिली होती.

दरम्यान, निलंबित तलाठी चोपडेंच्या कारनाम्याने संपूर्ण महसूल विभाग हादरले असून याप्रकरणी आणखी आरोपी याप्रकरणात वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर महसूल विभागातील काही अधिकारी, कर्मचारीसुद्धा यामध्ये सहभागी असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे पोलिसांनी सखोल चौकशी करून फसवणूक झालेल्या प्लॉट मालकांना न्याय द्यावा आणि महसूल मधील घोटाळेबाज बाहेर काढावे, असं सागण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.