‘तान्हाजी’ टॅक्स फ्री, मुख्यमंत्र्यांचा निर्णय, मंत्रिमंडळासोबत चित्रपट पाहणार

नरवीर तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा सांगणारा ‘तान्हाजी’ हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली

'तान्हाजी' टॅक्स फ्री, मुख्यमंत्र्यांचा निर्णय, मंत्रिमंडळासोबत चित्रपट पाहणार
Follow us
| Updated on: Jan 22, 2020 | 2:27 PM

मुंबई : उत्तर प्रदेश आणि हरियाणापाठोपाठ महाराष्ट्रातही ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ करण्यात आला आहे. ‘तान्हाजी’ करमुक्त करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Tanhaji Movie Tax free) निर्णय झाला. चित्रपट प्रदर्शन झाल्यानंतर तेराव्या दिवशी हा निर्णय घेण्यात आला आहे.

नरवीर तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा सांगणारा ‘तान्हाजी’ हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. तानाजी मालुसरेंची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अजय देवगणसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कालच ‘तान्हाजी’ पाहणार होते. मात्र त्यांनी मंत्रिमंडळासोबत हा सिनेमा पाहणार असल्याचं स्पष्ट केलं.

मुंबईतील ‘प्लाझा’ चित्रपटगृहात मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवकांसाठी ‘तान्हाजी’ चित्रपटाच्या विशेष खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आधीच नाशिकमध्ये ‘तान्हाजी’ सिनेमा पाहिला.

‘तान्हाजी’ सिनेमात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल, शरद केळकर, अजिंक्य देव, देवदत्त नागे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. कोंढाणा मोहीम फत्ते करताना वीरमरण आलेल्या तानाजी मालुसरेंचा गौरवशाली इतिहास ‘तान्हाजी’ सिनेमातून रुपेरी पडद्यावर साकारण्यात आला आहे.

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी थिएटरमध्ये जाऊनही ‘तान्हाजी’ पाहिला नाही!

प्रेक्षकांनी ‘तान्हाजी’ चित्रपट डोक्यावर घेतला असून दहा दिवसात दीडशे कोटींचा गल्ला जमवण्यात चित्रपटाला यश आलं आहे. महाराष्ट्रात ‘तान्हाजी’ चित्रपट ‘टॅक्स फ्री’ करावा अशी मागणी वारंवार केली जात होती.

दरम्यान, ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या ऐतिहासिक कथेशी सहमत नसल्याचं मत चित्रपटात उदयभानची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता सैफ अली खान याने व्यक्त केलं आहे. चित्रपट चालण्यासाठी राजकीय कथा बदलून दाखवण्यात आली आहे. हे अत्यंत धोकादायक आहे, असं सैफ एका मुलाखतीत म्हणाला होता.

Tanhaji Movie Tax free

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.