Tanhaji: The Unsung Warrior : ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’चा ट्रेलर रिलीज

ओम राऊत दिग्दर्शित आणि अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या तान्हाजी द अनसंग वॉरिअर (Tanhaji: The Unsung Warrior trailer) सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Tanhaji: The Unsung Warrior : 'तान्हाजी द अनसंग वॉरिअर'चा ट्रेलर रिलीज
Follow us
| Updated on: Nov 19, 2019 | 2:35 PM

मुंबई : अभिनेता अजय देवगणचा बहुचर्चित तान्हाजी द अनसंग वॉरिअर (Tanhaji: The Unsung Warrior trailer) या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ओम राऊत यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन (Tanhaji: The Unsung Warrior trailer)  केलं आहे.  अजय देवगण तानाजी मालुसरेंची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. अभिनेत्री सावित्री मालुसरेंच्या भूमिकेत काजोल आणि उदयभानच्या भूमिकेत सैफअलीखान  आहे.  तानाजी मालुसरेंची ही शौर्यगाथा 3डी मध्ये बघायला मिळणार आहे.

काजोल आणि अजय देवगण यांची जोडी नेहमी हिट ठरली आहे. ते मग सिनेमांमध्ये असो किंवा खऱ्या आयुष्यात. या दोघांनी आजवर ‘राजू चाचा’, ‘प्यार तो होना ही था’, ‘यू मी और हम’ यांसारख्या अनेक सिनेमांत काम केले आहे. तसेच या सिनेमाच्या निमित्ताने 12 वर्षांनंतर अजय देवगण आणि सैफ अली खान पुन्हा एकदा एका सिनेमात दिसणार आहेत. याआधी त्यांनी ओमकारा या सिनेमात सोबत काम केले होते. अजय देवगणने ‘तानाजी : द अनसंग वॉरीअर’ या सिनेमाचं पोस्टर नवीन वर्षाच्या पहिल्याचं दिवशी शेअर केलं होतं.

तानाजी मालुसरे कोण होते ?

तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणी मित्र होते, तसेच ते मराठा साम्राज्याचे वीर सुभेदार होते. स्वराज्य स्थापनेपासून प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत त्यांचा सहभाग होता. ते 4 फेब्रुवारी 1970 रोजी झालेल्या कोंढाण्याच्या लढाईसाठी ओळखले जातात.

कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंना दिली होती. तेव्हा आपल्या मुलाचं लग्न अर्धवट सोडून त्यांनी “आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे” म्हणत कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. किल्ल्यावर ताबा मिळवण्यासाठी त्यांना आपल्या प्राणांची आहूती द्यावी लागली. शिवाजी महाराजांनी “गड आला पण सिंह गेला”, या शब्दांत तानाजीच्या मृत्यूचे दु:ख व्यक्त केले होते.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.