मुंबईतले ठाकरे काही करु शकले नाहीत, नगरच्या कोपऱ्यात बसून माझं काय करणार : निलेश राणे

मुंबईतले ठाकरे-फाकरे काही करु शकले नाहीत, तर नगरच्या कोपऱ्यात बसून माझं काय करणार आहे. आमच्या नादी लागू नका, असा इशारा निलेश राणेंनी दिला. Nilesh Rane Rohit Pawar twitter war

मुंबईतले ठाकरे काही करु शकले नाहीत, नगरच्या कोपऱ्यात बसून माझं काय करणार : निलेश राणे

मुंबई : भाजपने पुकारलेल्या माझं अंगण, माझं रणांगण, महाराष्ट्र वाचवा या आंदोलनात आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनीही सहभाग नोंदवला. (Nilesh Rane Rohit Pawar twitter war) मुंबईतील जुहू येथील निवासस्थान ‘अधीश’ बाहेर राणे बंधूंनी आंदोलन केलं. यावेळी नितेश आणि निलेश राणेंनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला.

निलेश राणे यांनी रोहित पवार यांच्याविरोधात सुरु असलेल्या ट्विटरवॉरवर भाष्य केलं. “मुंबईतले ठाकरे-फाकरे काही करु शकले नाहीत, तर नगरच्या कोपऱ्यात बसून माझं काय करणार आहे. आमच्या नादी लागू नका, हे घरी बसून फक्त फेसबुक लाईव्ह करु शकतात”, असा हल्लाबोल निलेश राणे यांनी केला. (Nilesh Rane Rohit Pawar twitter war)

निलेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
“शिवसेना हॅशटॅग आंदोलन करु शकते. कारण ते बोटे दाबण्यात पटाईत. लोक शिव्या घालत आहेत. हॅशटॅग करुन लोकांची मने जिंकता येत नाहीत”, असं माजी खासदार निलेश राणे म्हणाले.

ट्विटर वॉर थांबवायचं की नाही त्यांचा विषय : निलेश राणे
यावेळी निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासोबत सुरु असलेल्या ट्विटरवॉर बद्दलही भाष्य केलं. “हे ट्विटर वॉर थांबवायचे की नाही त्यांचा विषय. मी साखरेबद्दल बोललो, मी पवार साहेबांचे नाव देखील घेतले नाही. ते आदरणीय आहेत आणि राहतील. पण माझा प्रश्न साखर उद्योगावर करोडो रुपये उडवले गेले त्याचा रिस्पॉन्स काय? साखर उद्योगावरचा नफा-तोटा महाराष्ट्राने कधी विचारायचा नाही? त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या अर्थकारणावर किती होतो हे विचारायचे नाही? आणि हे विचारलं तर त्या रोहित पवारला त्रास झाला? कारण तो स्वतः एक- दोन कारखाने चालवतो. आयते पैसे मिळतात. ते कुणाला कळायला नको म्हणून त्याने सुरुवात केली, मी नाही केली”, असं निलेश राणे म्हणाले.

मला वैयक्तिक दुष्मनी करण्यात रस नाही. आणि त्याची तेवढी कुवतही नाही. विषय होता साखरेचा. या उद्योगाचा महाराष्ट्राला किती फायदा झाला? आधी त्यांनी भाषा काय वापरली ते बघा! आमच्या नादी लागू नका नाही तर अजून फाडून खाईन. मुंबईतले ठाकरे-फाकरे काही करु शकले नाहीत, तर नगरच्या कोपऱ्यात बसून माझं काय करणार आहे. आमच्या नादी लागू नका, हे घरी बसून फक्त फेसबुक लाईव्ह करु शकतात, असा हल्लाबोल निलेश राणे यांनी केला.

ज्या शब्दात मला बोलले त्या शब्दात त्यांना सुनावणे हे माझं काम आहे आणि मी ते करणार. कुठे तरी माझ्याविरोधात तक्रार केली आहे. पण मला अजून कुठली नोटीस आलेली नाही, असं स्पष्टीकरण निलेश राणे यांनी दिलं.

नितेश राणे यांचं टीकास्त्र

नितेश राणे म्हणाले, “आज शासन दिसत नाही. आंदोलन करणं भाग होते, कारण रुग्णांची संख्या वाढतेय. नियंत्रण नाही. मुख्यमंत्री फेसबुक लाईव्ह सोडून कुठे दिसत नाहीत. अन्य राज्यांचे मुख्यमंत्री हॉस्पिटल, आयसोलेशन वॉर्ड येथे दिसतात. कोरोना संकटानंतर पुढे आर्थिक संकट आहे. आपला महाराष्ट्र दिशाहीन आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक घटक घाबरल्या परिस्थितीत आहे. म्हणून लोकांना कळण्यासाठी हे आंदोलन आहे”.

“रुग्ण वाढत आहेत, पण आकडे लपवले जात आहेत. मुख्यमंत्री क्वारंटाईन आणि जनता व्हेंटिलेटरवर आहे. रुग्णांना बेड नाही. खासगी हॉस्पिटल लूट करीत आहेत. सरकार फसवत आहे. त्यामुळे आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. आम्ही आज आमच्या अंगणात उभे राहून सर्वसामान्यांचा आवाज नोंदवत आहोत”, असंही नितेश राणे म्हणाले.

शिवसेनेला भगव्याचा अधिकार आहे का? : नितेश राणे
पालघर घटनेनंतर शिवसेनेला भगवा रंग लावण्याचा अधिकार राहिला आहे का ? संजय राऊत म्हणतात राम मंदिर विषय बाजूला ठेवा. त्यामुळे शिवसेनेने आपला आत्मा विकून सरकारमध्ये बसले आहेत. पहिल्यापासून विरोधी पक्ष भाजपने सरकारला मदत करण्याची भूमिका घेतली, सूचना दिल्या. पण 60 दिवस सुधारले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आपली आमदारकी मिळवण्यासाठी जो वेळ घालवला तो प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालवला असता तर हे आंदोलन आम्हाला करण्याची वेळ आली नसती, असंही टीकास्त्र नितेश राणे यांनी सोडलं.

संबंधित बातम्या 

काही लोकांची पातळी खालची, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, निलेश राणेंच्या ट्विटवर जयंत पाटलांचा रोहित पवारांना सल्ला 

तुमचं काम माहीत आहे, बोलत राहिलात तर ट्रेलरही देईन, निलेश राणे-रोहित पवारांमध्ये ट्विटर वॉर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *