मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अतिवृष्टीग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Oct 23, 2020 | 5:24 PM

मुंबई : राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अतिवृष्टीग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. ही मदत नुकसानग्रस्तांना तातडीने वितरित करण्यात येणार असल्याचं जाहीर केले आहे. परंतु ही मदत अतिशय तोकडी असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. (Thackeray government’s package for rain affected farmers is very less says Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन सरकारने जाहीर केल्या पॅकेजवर नाराजी व्यक्त केली आहे. फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द फिरवत आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे आहे. बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना त्यांनी निव्वळ बहाणे शोधले आहेत. शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे.

नियमित अर्थसंकल्पातील आकड्यांनाच पॅकेज भासवून मलमपट्टी केल्याचा आव सरकार आणू पाहत आहे. परंतु, केवळ देखावा निर्माण करून शेतकर्‍यांना अजिबात मदत मिळणार नाही. बहाणेबाजी करून महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर निराशा आणि फसवणूक केली आहे.

आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, किमान शेतकर्‍यांच्या बाबतीत तरी आणि झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहता अशा काल्पनिक आकड्यांची धूळफेक मुख्यमंत्री करतील, असे वाटले नव्हते. हा शेतकर्‍यांसोबत झालेला मोठा विश्वासघात आहे. निसर्गाने तर अन्याय केलाच आहे, आता सरकारही सूड घेत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदतीबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अनिल परब उपस्थित होते.

केंद्राच्या नियमानुसार, बागायती आणि कोरडवाहूसाठी 6 हजार ८०० रुपये दिले जाऊ शकतात. पण आम्ही हेक्टरी 10 हजार रुपये मदत देणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तर फळबागांसाठी 18 हजार प्रति हेक्टर ही केंद्राच्या नियमानुसार, पण राज्य सरकार 25 हजार प्रति हेक्टर मदत करणार आहे, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली.

साधारणपणे ऑक्टोबर 2019 पासून आतापर्यंत शेतकऱ्यांना 30 हजार 800 कोटी रुपये दिले. यात कर्जमुक्तीचाही समावेश आहे. 9 हजार 800 कोटी विविध नैसर्गिक आपत्तींसाठी दिले आहेत. राज्याचं केंद्राकडून जवळपास 38 हजार कोटी रुपये एकूण येणं बाकी आहे. त्यात निसर्ग चक्रीवादळ – एक हजार 65 कोटी रुपये बाकी, पूर्व विदर्भात पूर – 800 कोटी रुपये बाकी आहेत. याचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. पण पैसे आलेले नाहीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.

संबंधित बातम्या

कसं असणार 10 हजार कोटींचं पॅकेज?

पश्चिम महाराष्ट्रातील पुरावेळी केंद्राकडून 900 कोटीही आले की नाही शंका, संभाजीराजेंचं भाजपकडे बोट

(Thackeray government’s package for rain affected farmers is very less says Devendra Fadnavis)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.