‘इलायाथलापथी’च्या मदतीला ‘थलैवा’ धावला!

हैदराबाद : सुपरस्टार विजयच्या ‘सरकार’ सिनेमातून दक्षिण भारतात सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह दृश्य या सिनेमात दाखवल्याचा आरोप एआयएडीएमकेचा आहे. त्यावरुन मोठा गदारोळ निर्माण झाला असताना, सिनेसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत हे मात्र विजयच्या पाठीशी उभे राहिले आहेत. रजीनकांत नेमकं काय म्हणाले? “सेन्सॉर बोर्डने ‘सरकार’ या सिनेमाला ‘अ’ प्रमाणपत्र …

‘इलायाथलापथी’च्या मदतीला ‘थलैवा’ धावला!

हैदराबाद : सुपरस्टार विजयच्या ‘सरकार’ सिनेमातून दक्षिण भारतात सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह दृश्य या सिनेमात दाखवल्याचा आरोप एआयएडीएमकेचा आहे. त्यावरुन मोठा गदारोळ निर्माण झाला असताना, सिनेसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत हे मात्र विजयच्या पाठीशी उभे राहिले आहेत.

रजीनकांत नेमकं काय म्हणाले?

“सेन्सॉर बोर्डने ‘सरकार’ या सिनेमाला ‘अ’ प्रमाणपत्र दिलं आहे. असं असताना देखील एआयएडीएमके पक्षाने सिनेमातील दृश्यांवर आक्षेप नोंदवणं चुकीचं असून, हे कायद्याला धरुन नाही. त्यामुळे मी या घटनेचा तीव्र निषेध करतो.” असं ट्वीट रजनीकांत यांनी केलं आहे.

एआयएडीएमकेची धमकी

‘सरकार’ सिनेमाबाबत गेल्या काही दिवसात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. सिनेमाच्या निर्मात्याला एआयएडीएमकेच्या ज्येष्ठ मंत्र्याने थेट धमकीच दिली आहे. सिनेमातील आक्षेपार्ह दृश्य न हटवल्यास कायदेशीर कारवाई करु, असा इशाराही दिला आहे.

या प्रकरणानंतर तामिळनाडूचे कायदेमंत्री सी. व्ही. षणमुगम यांना विचारलं असता, ते म्हणाले, “सरकार सिनेमात दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या संदर्भात चुकीचं दृश्य दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे आम्ही सिनेमावर बंदी घालण्याची आम्ही मागणी करत आहोत.”

तामिळनाडूत ‘सरकार’ सिनेमावरुन मोठा गोंधळ निर्माण झाला असतानाही, सिनेमा रिलीज करण्याचा निर्धार निर्मात्यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काळात या सिनेमावरुन तामिळनाडूचे राजकारण ढवळून निघणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *