केवळ 450 रुपयात कोरोना टेस्ट, 5 मिनिटात रिपोर्ट, आव्हाडांच्या पुढाकाराने ठाण्यात चाचण्या

अवघ्या 450 रुपयांमध्ये ही टेस्ट करण्यात येणार असून अवघ्या पाच मिनिटांमध्ये त्याचा अहवालही मिळणार आहे.

केवळ 450 रुपयात कोरोना टेस्ट, 5 मिनिटात रिपोर्ट, आव्हाडांच्या पुढाकाराने ठाण्यात चाचण्या
Follow us
| Updated on: May 28, 2020 | 3:49 PM

ठाणे :कोव्हिड-19‘ ची तपासणी महाग (COVID-19 Test) असल्याने अनेक गोरगरीबांना ही तपासणी करणे शक्य होत नाही. परिणामी, रुग्णांची अचूक संख्या मिळत नसल्याने कोरोनावर मात करणे अवघड होत आहे. त्यावर मात करण्यासाठी नाशिकच्या ईएसडीएस कंपनीने विकसीत केलेले तंत्रज्ञान आता ठाणे शहरातही आले आहे. त्यामुळे ठाण्यात आता कमी खर्चात कोरोनाची चाचणी करणं (COVID-19 Test) शक्य झालं आहे.

राज्यात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य सेनानी कावेरीताई पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष मिलींद पाटील यांनी हा उपक्रम कळवा येथे सुरु केला आहे. अवघ्या 450 रुपयांमध्ये ही टेस्ट करण्यात येणार असून अवघ्या पाच मिनिटांमध्ये त्याचा अहवालही मिळणार आहे.

सध्या ओमान, दुबई या देशांसह केरळ या राज्यात एक्स-रेद्वारे कोव्हिडची टेस्ट करण्यात येत आहे. तर, नाशिक महानगर पालिकेनेही हे तंत्रज्ञान स्वखर्चाने सुरु केले असून फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून एका व्हॅनद्वारे सबंध शहरामध्ये ही चाचणी नाशिक महापालिकेने सुरु केली (COVID-19 Test) आहे.

छातीच्या एक्स-रेचा अभ्यास करुन त्याद्वारे शरीरात गेलेल्या कोरोना विषाणू, त्याचे प्रमाण, टक्केवारी आदींची विस्तृत माहिती मिळवणे शक्य होत आहे. नाशिकमधील ईएसडीएस या कंपनीने या संदर्भात संशोधन केले होते. सुमारे 50 हजार लोकांच्या एक्स-रेची तपासणी करुन कोरोनाची चाचणी करण्यात या कंपनीला यश आले आहे. त्यामुळेच सध्या हे केरळमध्येही वापरण्यात येत आहे.

आता हेच तंत्रज्ञान गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य सेनानी कावेरीताई पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष मिलींद पाटील यांनी कळवा येथे आणले आहे.

COVID-19 Test

संबंधित बातम्या :

कोरोनाबाधित एका रुग्णाने हजारोंची चिंता वाढवली, बीडमध्ये 12 गावं कडकडीत बंद!

Pimpri Chinchwad | निगडी-आकुर्डीत 180 कोरोनाग्रस्त, पिंपरीत कोणत्या प्रभागात किती?

Fake News Alert | सलून, ब्युटी पार्लरबाबत ‘ती’ व्हायरल अधिसूचना फेक!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.