घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यांचा ठाणे पोलिसांकडून छडा, आरोपींकडून 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

या आरोपींकडून तब्बल 22 लाख 53 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना गोवा आणि एकाला मुंबईतून अटक करण्यात आली

घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यांचा ठाणे पोलिसांकडून छडा, आरोपींकडून 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

ठाणे : घरफोडी, चोरीच्या तीन गुन्ह्यांची नौपाडा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने उकल करत महिलेसह एकूण सहा आरोपींना अटक केली (Thane Police Investigation). या आरोपींकडून तब्बल 22 लाख 53 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना गोवा आणि एकाला मुंबईतून अटक करण्यात आली (Thane Police).

घरामध्ये घरकाम करणाऱ्या महिलेने त्याच घरातील 11 लाख 50 हजार रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना घडली होती (Thane Police Investigation). या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी घरकाम करणाऱ्या महिलेला अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गाडीवरुन मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक

त्याशिवाय, रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांकडून जबरदस्तीने मोबाईल खेचुन दुचाकीवरून पळुन जाणाऱ्या दोघा अट्टल चोरांना नौपाडा पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटकेतल्या दोघा चोरट्यांकडून 58 हजार 500 रुपये किमतीचे 9 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपींनी नौपाडा आणि नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी दोन असे एकूण चार चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. तर मोबाईल खेचल्यानंतर धूम स्टाईल पळून जाण्यासाठी वापरण्यात येणारी एक पल्सर दुचाकी देखील पोलिसांनी हस्तगत केली. असिफ मलिक बागवान आणि अकबर उर्फ दिशान अख्तर शेख राहणार भिवंडी अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नाव आहेत.

घरफोडी करणारे तिघं गजाआड

दुसरीकडे, भरदिवसा चोरी, घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या दोघांना गोवा येथून, तर एकाला मुंबईतील चेंबूर परिसरातून नौपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बाबू जमालूद्दीन खान, संजय रत्नेश कांबळे उर्फ सलीम कुबड्या, विजयानंद रामा इंगळे उर्फ विजय अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. अटकेतल्या आरोपींकडून पोलिसांनी 10 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.

नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खोपट येथील शिव टॉवर मध्ये राहणाऱ्या करुणा ठाणगे यांच्या घरात 23 ऑक्टोबर 2019 रोजी भरदिवसा चोरट्यांनी घरफोडी करून 10 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. त्यानुसार, नौपाडा पोलिसांचे एक पथक गोवा येथे गेले होते. या पथकाने 7 नोव्हेंबर रोजी बाबू जमालूद्दीन खान आणि संजय रत्नेश कांबळे उर्फ सलीम कुबड्या या दोघांना गोवा येथून अटक केली. तर विजयानंद रामा इंगळे उर्फ विजय यास 8 नोव्हेंबर रोजी चेंबूर परीसरातून बेड्या ठोकल्या. या तिघा चोरट्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून 7 लाख 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 2 लाख 25 हजार रुपये किमतीची कार असे एकूण 10 लाख 5 हजाराचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *