तक्रारदार महिलेला मुंबई पोलिसांची अपमानास्पद वागणूक  

मुंबई : महिलांच्या सुरक्षेबाबत मुंबईत नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. आता तर मुंबई पोलीसही महिलांच्या सुरक्षेबाबत किती हलगर्जी आहेत, ते घाटकोपरमधील एका घटनेतून समोर आलंय. गुन्हा नोंदवून घेताना पोलिसांच्या उद्घट वर्तवणुकीचा सामना महिलेला घाटकोपरमध्ये करावा लागला. रिक्षा चालकाने महिलेचा मोबाईल चोराला होता. या प्रकरणी महिला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करायला गेली, त्यावेळी घाटकोपर पोलिसांनी केवळ …

तक्रारदार महिलेला मुंबई पोलिसांची अपमानास्पद वागणूक  

मुंबई : महिलांच्या सुरक्षेबाबत मुंबईत नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. आता तर मुंबई पोलीसही महिलांच्या सुरक्षेबाबत किती हलगर्जी आहेत, ते घाटकोपरमधील एका घटनेतून समोर आलंय. गुन्हा नोंदवून घेताना पोलिसांच्या उद्घट वर्तवणुकीचा सामना महिलेला घाटकोपरमध्ये करावा लागला.

रिक्षा चालकाने महिलेचा मोबाईल चोराला होता. या प्रकरणी महिला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करायला गेली, त्यावेळी घाटकोपर पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा म्हणून त्याची नोंद केली.

काय आहे प्रकरण?  

शनिवार (17 नोव्हेंबर) रोजी रेश्मा हळदणकर या आपल्या लहान मुलीसोबत घाटकोपरमधील जगदुशा नगर येथून भटवाडी येथे निघाल्या होत्या. यावेळी त्यांनी एक रिक्षा पकडली. रिक्षा चालकाने मीटर खराब असल्याचे सांगत अंदाजे पैसे द्या असं सांगितले.

जागृती नगर येथील मेट्रो स्थानकाजवळ निर्मनुष्य जागेवर रिक्षा येताच, चालकाने रेश्मा यांना त्यांच्या मोबाईलवरून एक फोन करण्यास सांगितलं. आपली आई आजारी असून डॉक्टरांना फोन करायचा आहे सांगून एका क्रमांकावर फोन लावला. रिक्षा बाजूला काळोखात उभी करून चालकाने फोन कानाला लावत काही अंतर चालत बोलण्याचे नाटक करत पुढे गेला आणि तिथून थेट पळ काढला.

या स्थितीत रेश्मा यांनी घरी संपर्क साधला. रेश्मा यांच्या नातेवाईकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनस्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी रिक्षा ताब्यात घेतली.

रेश्मा यांना घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सांगितले. रेश्मा घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेल्यानंतर त्यांना प्रथम पोलिसांनी मोबाईल गहाळ झाले असे पत्र दिले. परंतु त्यांनी मोबाईल चोरला असे सांगितल्यानंतर पोलिसांनी कलम 403 अंतर्गत अदखलपात्र म्हणजेच किरकोळ एनसी नोंदवून त्यांना घरी पाठवले.

याबाबतची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली. मात्र याबाबत घाटकोपर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्ताराम गिरप यांनी अधिकाऱ्यांनी घेतलेली तक्रार योग्य असून दखलपात्र गुन्ह्यांचा कागद पोलीस डब्बे खाण्यास वापरतात असे उद्धट उत्तर दिले.

याप्रकरणी आता वरिष्ठ पोलिसांकडे तक्रार केली आली असून पोलीस काय पावले उचलतात? हे पाहणे गरजेचे आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *